
Manoj Jarange on Strike : सगेसोयरे अधिसूचनेची येत्या 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी केली जावी अशी मागणी करत, अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मागासवर्ग आयोगाने आज अहवाल दिला आहे. सरकारने तो स्वीकारला आहे. त्यासाठी अधिवेशन घेण्यात येणार आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आता जो मागासवर्ग आयोगाने आज जो अहवाल दिला आहे. तो नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांनी(सरकार) म्हटलं आहे. आपलं म्हणणं स्पष्ट आहे. जे आरक्षण पाहिजे ते सर्वोच्च न्यायालयात टिकावं म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला आहे. यासाठी मराठे लढले.
|
|
''ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सग्यासोयऱ्याचा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. मराठवाड्यातील सगळा मराठा कुणबी आहे. कुणबी नोंदी सापडल्या त्यांना द्यावेच लागेल, मात्र मागासवर्गीय अहवाल घेऊन ते आरक्षण देताना, मात्र ते चालणार नाही, सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी केल्या शिवाय कोणाला सोडणार नाही. मागासवर्ग आयोगाचे पण राहु द्या, ज्यांना नकोय त्यांना जबरदस्ती नाही. 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा. आंतरवालीसह सर्व गुन्हे मागे घ्या. 20 तारखेपर्यंतच मी उपोषण करणार, सरकारने सरकारचं धोरण ठरवलं आहे, मराठे मराठ्यांचे धोरण ठरवणार आहेत. मागासवर्गीय आयोग, सग्यासोयऱ्यांचे आणि कुणबी या सर्वच बाजूने मराठयांना आरक्षण मिळणार'', असं जरांगेनी म्हटलं आहे.
"सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करावी लागेल. 20 तारखेपर्यंत काही करून अध्यादेशाची अंमलबजावणी करा. हैदराबाद गॅझेट घ्या. सग्या सोयऱ्यासाठी समितीला एक वर्ष वाढवून द्यावे" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. 20 तारखेपर्यंतच्या उपोषणानंतर सरकारने सरकारचे बघावे, मराठा मराठ्यांचे बघेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
'आम्ही सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी वर ठाम आहोत. मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार' असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.
20 फेब्रुवारीपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा
"फसवणूक किंवा गैरसमज झाला म्हणून आरक्षणाचा विषय संपलेला नाही. काही जण म्हणतात आपल्याला फसवलं, फसवलं असेल तर फसवून दे पण, आपण सहजासहजी सोडणारे मोडक्या पायाचे नाहीत. पुन्हा लढा सुरु करू, आपण आपल्यावर विश्वास ठेवायचं. सगेसोयरा कायदा बनवून त्यांची अंमलबजावणी करण्यावरचं आम्ही ठाम आहोत'', असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार

























Subscribe to my channel




