
Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते दत्ता गोर्डे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज दुपारी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांचा जाहीर प्रवेश झाला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून, पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते यावेळी ठाकरे गटात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे दत्ता गोर्डे पैठण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने 2019 साली दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार ठरले होते.
पैठण तालुक्यातील आक्रमक कार्यकर्ते म्हणुन ओळख असलेले दत्ता गोर्डे यांनी आज अजित पवारांची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले दत्ता गोर्डे पूर्वी शिवसेनेतच होते. त्यामुळे, आता पुन्हा ते स्वगृही परत आले असून, शिवबंधन हाती बांधले आहे. सोबतच ठाकरे गटाकडून ते आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते.
|
|
कधीकाळी भुमरेंचे विश्वासू...
दत्ता गोर्डे हे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते. तसेच शिंदे गटाचे मंत्री तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. भुमरे यांनी त्यांना पैठण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष केले होते. मात्र, पुढे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि गोर्डे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते काही काळ भाजपमध्ये राहिले. पुढे त्यांनी 2019 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक ही लढवली. 13 हजारच्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. परंतु यावेळी ते 69 हजार 924 मतदान घेऊन ते दुसर्या क्रमांकाचे उमदेवार ठरले. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे लक्षात येताच गोर्डे यांनी आता ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
गोर्डे यांचा राजकीय प्रवास...
गोर्डे यांनी मागील पंधरा वर्षांत नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षपर्यंतचा राजकीय प्रवास केला आहे. मध्यंतरी ते भाजपमध्येही होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते काही दिवस अजित पवार यांच्या गटातही होते. ते आक्रमक आणि जनतेच्या संपर्कातील कार्यकर्ते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांना ठाकरे गट उमेदवारी देऊ शकतो अशीही चर्चा आहे.
शहर
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- तुमचे रेशन कार्ड बंद झाले आहे का? घरबसल्या मोबाईलवरून 'या' सोप्या पद्धतीने करा पुन्हा सुरू!
महाराष्ट्र
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
गुन्हा
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
- नागपूरमध्ये बनावट औषधांचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, सहा जणांवर गुन्हे दाखल
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




