
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक जशजशा जवळ येतील तसतसे राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे अजित पवार हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आव्हान देत असतानाच आता शरद पवार गटानेही लोकसभेचे रणशिंग फुंकायला सुरूवात केली आहे. उद्यापासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभा निवडणूकांसंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाचे शिबीर...
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्यापासून (३, जानेवारी) शिर्डीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पालखी निवारा परिसरात होणाऱ्या या शिबिराची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या शिबिरासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
|
|
लोकसभेचे रणशिंग फुंकणार!
'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' हे ब्रीद वाक्य घेऊन शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकवटणार आहेत. मागील वर्षीही याच ठिकाणी राष्ट्रवादीचे शिबिर झाले होते. यावेळी मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर या शिबिराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या शिबिरातून शरद पवार गट फुंकणार आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे.
आमदार प्राजक्त तनपुरेंची टीका...
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या शिबिराची माहिती देताना अजित पवार गटावर निशाणा साधला. "सत्ता नसतानाही शरद पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकांचे हे शिबिर आहे. सर्वांना पवार साहेबांच्या विचारांची ऊर्जा मिळणार असून देशात आणि राज्यात विरोधी पक्षांना चिरडण्याचे धोरण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप..
"आम्ही लाखों लोकांचे प्रतिनिधित्व करतो. मात्र निधी वाटपात दूजाभाव केला जातोय. ही लोकशाहीची हत्या केल्या सारखं आहे. दबाव टाकून विरोधी पक्षांची लोकं फोडली जात आहेत... असे गंभीर आरोप त्यांनी केले.
शहर
- मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
महाराष्ट्र
- मुंबई: पोलिसांवर जीवघेणे हल्ले कुठे उगारली तलवार तर कुठे दुचाकी घालून चिरडण्याचा प्रयत्न!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




