मुंबई: कायदेशीर कारवाईचा राग मनात धरून पोलिसांवर हल्ला करण्याच्या दोन घटना मुंबईत समोर आल्या आहेत. एमआरए मार्ग परिसरात नाकाबंदीवेळी कारवाईसाठी दुचाकी अडविल्याने एका आरोपीने पोलिस कर्मचाऱ्यावर छोटी तलवार उगारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर भांडुपमध्ये मद्यधुंद अवस्थेत भरधाव दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास कल्पना जंक्शन, पी. डीमेलो रोड येथे पोलिस कर्मचारी सचिन कोकरे नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी कर्नाक बंदरच्या दिशेने विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना त्यांनी थांबविले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असताना दुचाकीवरील आरोपीने त्याच्याकडील छोटी तलवार कोकरे यांच्यावर वार करण्यासाठी उगारली.
नाकाबंदीदरम्यान प्रकार
आरोपीने त्यांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्या सरकारी गणवेशाचे नुकसान केले. तसेच त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल आहे. दुसरी घटना भांडुप पश्चिम येथील मद्रास कॅफे परिसरात घडली. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे विशेष ऑल आऊट मोहिमेअंतर्गत नाकाबंदी सुरू होती.
जाणीवपूर्वक दुचाकी अंगावर घातल्याचा आरोप
पहाटे २.२० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून एक तरुण भरधाव वेगाने दक्षिण वाहिनीवरून आला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो हुलकावणी देऊन निघून गेला. सुमारे १० ते १५ मिनिटांनी तोच तरुण पुन्हा त्याच मार्गाने नाकाबंदीच्या दिशेने भरधाव वेगाने आला. पोलिस अंमलदार आप्पासो हजारे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, तरुणाने जाणीवपूर्वक दुचाकी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
बॅरिकेडला दुचाकी धडकल्याने तरुण गंभीर जखमी
हजारे यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उडी घेतली. त्यानंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती नाकाबंदीच्या बॅरिकेडला धडकली आणि तरुण रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात नेले. चौकशीत त्याचे नाव केशव सुब्रलोगा नायडू (२७) असून तो मद्यधुंद अवस्थेत विनापरवाना वाहन चालवत असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा नोंदवत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: दहिसरमध्ये डॉक्टरांच्या दवाखान्याचे शटर उचकटून ४० हजार रुपयांची रोकड लांबवली!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
महाराष्ट्र
- मुंबई: दहिसरमध्ये डॉक्टरांच्या दवाखान्याचे शटर उचकटून ४० हजार रुपयांची रोकड लांबवली!
- पुणे: "कुंभमेळा रद्द करा, ३५ हजार कोटी शेतकऱ्यांना द्या!" दुष्काळी परिस्थितीवरून आक्रमक झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा राज्य सरकारला कडक इशारा!
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात

























Subscribe to my channel




