अनादिकाला पासून मनुष्याची ही जिज्ञासा आहे की सत्य काय आहे? ज्यावेळेस पासून माणसाने विचार करणे आरंभ केले त्यावेळेस पासून त्याच्या मनात हाच एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की सत्य काय आहे? वास्तविकता काय आहे? तत्व काय आहे? सर्वसाधारणपणे सत्य म्हणजे खरे इतकेच आपण जाणतो. परंतु मात्र कथन अभिव्यक्ती तेवढेच सत्य नसून संपूर्ण सत्य स्वरूप व्यापक आणि विराट असते. कोणत्याही व्यक्तीची समज, ज्ञान आणि अभिव्यक्ती क्षमता परिपूर्ण नसते. वास्तविकत: आपली इंद्रिय क्षमता, ग्रहण शक्ती, तर्कबुद्धी, विचारक्षमता, वाणी, भाषा ही अपूर्ण असते म्हणून ती संपूर्ण सत्याच्या व्यक्ततेमध्ये एका वेळी सक्षम नसते. म्हणूनच आपले जाणण्याचे साधनं अपूर्ण असतील तर समजण्याची क्रिया ही मात्र आमची आंशिक सत्य असते आणि त्यापुढे आपण जाऊ शकत नाही. महत्त्वाचे सूत्र आहे : सहप्रतीपक्ष पदार्थ हा एकत्व नसतो. तो अनेक प्रकारे व्यक्त केला जाऊ शकतो. प्रत्येक पदार्थांमध्ये परस्पर विरोधी तत्वही विद्यमान असतात. उदाहरणार्थ उजेड आहे तर अंधकारही असतो. अंधकार नष्ट होऊन उजेड त्याच ठिकाणाहून येतो. सुख आणि दुःख आहे. आपण दुःखाचा अनुभव करतो परंतु तेच दुःख जाऊन त्याच ठिकाणी परत सुखाचा अनुभव होतो. ऊन सावली आहे. ऊन जाते आणि त्याच ठिकाणी सावली येते. विचार-अविचार ही असतो. एक विचार जातो त्याच ठिकाणी दुसरा विचार येतो. या सर्व विद्यमानता एकाच जागी असतात. म्हणून एकाचे अस्तित्व जाऊन दुसरा प्रगट होतो. तो इतर दुरून कुठूनही येत नाही तो त्याच ठिकाणी असतो. मात्र हे जाणण्याच्या बुद्धीचा अविष्कार व्हायला हवा. विरोधी तत्वांचे सह-अस्तित्व असते हे जाणल्यानंतर कसल्याही प्रकारचा अन्यत्वभाव उरत नाही. जसे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार आपले एक मत बनलेले असते. त्याचप्रमाणे अन्य व्यक्तीचेही स्वतःचे मत असते. वस्तूच्या विराट स्वरूपाची जाणीव होऊन अन्य मताचा आदर केला तर परस्पर विरोधी भाव नष्ट होतात. हत्ती आणि अंध व्यक्ती खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावाच्या बाहेर एक हत्ती आला. गावातील फारशा लोकांनी हत्ती पाहिलेला नव्हता. हत्ती पाहायला जाण्यासाठी गावाच्या बाहेर गर्दी होऊ लागली. आपणही हत्ती पाहून यावे असे प्रत्येकाला वाटू लागले. हत्ती पाहून आलेले लोक गावात येऊन परस्पर चर्चा करू लागले. याच गावामध्ये काही अंध व्यक्ती होते. हत्ती कसा असतो आहे हे जाणून घ्यावे असे त्यांनाही वाटू लागले. आपसात योजना आखून गावातील अंध व्यक्ती हत्ती जाणून घेण्यासाठी गेले. सर्व अंध व्यक्ती हत्तीला स्पर्श करून तो कसा आहे याचा अंदाज मनामध्ये बांधत होते. आणि आता ते आपसात बोलू लागले. त्यापैकी ज्याने हत्तीच्या सोंडेला स्पर्श करून पाहिला तो म्हणे हत्ती मुसळासारखा आहे. ज्याने हत्तीच्या पायाला स्पर्श करून जाणवला तो अंध व्यक्ती हत्ती खांबासारखा आहे असे म्हणू लागला. ज्याने हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला तो व्यक्ती हत्ती झाडू सारखा आहे असे आग्रहाने सांगू लागला. एका अंध व्यक्तीने हत्तीच्या कानाला स्पर्श केला आणि तो आपले मत ठामपणे मांडू लागला की हत्ती सुपा सारखा आहे. हत्ती विषयी हत्ती कसा आहे हे स्पष्ट करण्यासाठी सर्व अंध व्यक्ती एकमेकांशी आता जोरजोरात बोलू लागले. प्रत्येक जण म्हणत होता की माझेच म्हणणे बरोबर आहे, मी म्हणतो तसाच हत्ती आहे. काही वेळाने त्यांच्या विवादाचे रूपांतर परस्पर भांडणांमध्ये झाले. प्रत्येक अंध व्यक्ती आपल्या मताचा दुराग्रह करू लागला. याचवेळी त्यांच्या बाजूने एक सुशिक्षित समजदार व्यक्ती जात होता. त्याने पाहिले की काही अंध व्यक्ती हत्तीच्या स्वरूपाविषयी आपसात भांडत आहेत, तो जवळ आला त्यांनी त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि त्यांना एका बाजूला घेऊन गेला. विवाद करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी स्पष्टीकरण दिले की तुमचे सर्वांचे म्हणणे बरोबर आहे. कोणीही चुकीचा नाही. परंतु तुम्ही हत्तीच्या एका अवयवाला स्पर्श केलेला आहे, आणि हत्ती केवळ त्याच स्वरूपाचा आहे असा आग्रह करत आहात. तुम्ही सर्वजण जे म्हणत आहात ते सर्व मिळून हत्तीचे पूर्ण अवयव होतात. आणि त्या सर्वांचा मिळून एक हत्ती होतो. त्या व्यक्तीच्या संबोधनानंतर सर्व अंध व्यक्तींच्या लक्षात आले की आपल्या सर्वांचं म्हणणं बरोबर आहे परंतु आपला समन्वय नसल्यामुळे वाद विवाद होत आहेत. आपण समजदारीची भूमिका घेतली आणि दुसऱ्याच्या मताचा आदर केला तर आपले आपसात वाद होणार नाहीत असा बोध घेऊन सर्वजण शांततेने गावात परतले. इतरांच्या मताचा आदर या गोष्टीवरून आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे की आपले मत मांडत असताना दुसऱ्याच्या मताचा आदर केला पाहिजे. आणि केवळ आपलेच मत ग्राह्य असावे असा दूराग्रह नसावा. कारण सत्य एकांगी नसते, ते अनेक अंगी असते. त्यापैकी सर्व अंग खरे असतात. कोणते एकच अंग खरे आहे आणि दुसरी बाजू खरी नाही हा दुराग्रह कामाचा नसतो. सत्य असीम आहे , भाषेला सीमा आहे, अभिव्यक्ती त्याहून कमकुवत असते. प्रत्येक जण आपल्या बुद्धीप्रमाणे आणि प्राप्य शक्तीने व्यक्त होत असतो. पाण्याने अर्धवट भरलेला ग्लास : एखादा ग्लास अर्धा भरलेला आहे हे खरे, तसेच तो अर्धा रिकामा आहे हेही खरेच. ग्लास काचेचा आहे किंवा स्टीलचा आहे हेही चुकीचे नाही. ग्लास टेबलावर आहे किंवा जमिनीवर आहे हेही सत्यच. ग्लासमध्ये अर्धे पाणी आणि अर्धी हवा आहे हे सत्यही नाकारता येणार नाही. म्हणून सत्य अनेकांगी आहे, एकांगी नाही. हेच खरे. असाच अर्थबोध आपणास घ्यावयाचा आहे. दुराग्रह नको आपण ज्यावेळी केवळ आपल्याच विचारांचा आग्रह करतो त्यावेळी तो दुराग्रह बनत असतो. केवळ आपल्याच दृष्टिकोनाचा आग्रह न बाळगता दुसऱ्याने व्यक्त केलेल्या विचारातही काही तथ्य असेल असे मत असावे. याचाच अर्थ इतरांच्या विचाराबद्दल सहिष्णू बनणे. परस्पर वाद विवाद न होऊ देण्यासाठी वैचारिक सहिष्णुता खूप महत्त्वाची असते. आपल्या स्वतःच्या भावनांवरती आपले नियंत्रण असावे. इतरांच्या विचारांना समजण्याचा प्रयत्न असावा. प्रत्येकाने स्वतःच्या गर्व आणि अहंकाराला महत्त्व दिले तर कुटुंबात, समाजात आणि जगामध्ये शांतीपूर्ण सह-अस्तित्व आणि स्थिरता नांदू शकत नाही. (बलराज संघई, 9420015108 | वाळूज औद्योगिक परिसर, छत्रपती संभाजीनगर)
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



