
Amravati : यंदा मोसमी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला. त्यामुळे कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यात दसऱ्यापासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापारी हमीभावापेक्षा कमी किमंतीमध्ये खरेदी करीत आहेत. दिवाळीनंतरच सीसीआयकडून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. यंदा खरीप हंगामात केंद्र सरकारने ७ हजार २० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. पण व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
|
Fake Note Case : बनावट नोटांचे जाळे परराज्यात? आणखी दोघांना अटक, एक आरोपी परप्रांतीय |
‘सीसीआय’चा ‘सब एजंट’ म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करते. पणन महासंघाकडून राज्यात ५० केंद्रावर कापूस खरेदी होत असते. जळगाव, नागपूर, वणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, परभणी,नांदेड, परळी व छत्रपती संभाजीनगर या ११ झोनमध्ये २ टप्प्यांत कापूस खरेदीची सुरुवात पणनकडून केली जाईल. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
देशात कापूस दरांवर दबाव वाढला आहे. ही स्थिती लक्षात घेता शासनाने खरेदीसंबंधी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आधार दिला असून, हरियाना, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात सीसीआयने खरेदी सुरू केली आहे. ७०२० रुपये प्रतिक्विंटल दर किंवा हमीभाव कापसाला तेथे दिला जात आहे. सध्या देशात सुमारे सीसीआयचे ५३ खरेदी केंद्र सुरू आहेत. पश्चिम विदर्भात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. दुसरीकडे कापूस प्रक्रिया उद्योग रखडतच सुरू आहे. जिनिंग-प्रेसिंग कारखानदार आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता लक्षात घेता सरकारने बाजारात हस्तक्षेप केला असून, खरेदी सुरू केली आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

