
Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सध्या कांद्याच्य दरात वाढ होताना दिसत आहे. सोलापुरात कांद्याला प्रति किलोसाठी 40 ते 45 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक घटल्यानं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले आहेत. याचा मात्र, शेतकऱ्यांना फायदा होत असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात कांद्याला होता 25 ते 30 रुपयांचा दर
सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. प्रति किलो कांद्याला 40 ते 45 रुपयेपर्यंतचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक घटल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले आहेत. मागच्या आठवड्यात सोलापुरात कांद्याला सरासरी 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर होता. आज मात्र भाव 40 ते 45 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. कांद्याला भाव मिळाला तरीही शेतकरी मात्र समाधानी नाहीत. कारण, कांद्याला चाळीस रुपये भाव मिळाला असला तरीही मागील आठ महिन्यांपासून चाळीत कांदा राहिल्याने त्याचे वजन घटले आहे. त्यामुळे कांद्याला प्रत्यक्ष 40 रुपये भाव मिळाला असला तरी कांद्याचे वजन घटल्याने आम्हाला फारसा फायदा नसल्याची माहिती कांदा उत्पदक शेतकऱ्यांनी दिली आहे.
|
Udayanraje Bhosale News : शिवप्रेमींनाे ! प्रतापगड भेट सुखावह होणार : उदयनराजे भाेसले |
नवरात्रीचा सण संपताच कांद्याच्या दरात वाढ
नवरात्रीचा सण संपताच कांद्यानं पुन्हा एकदा दराची झेप घेतली आहे. मागच्या दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबई सह राज्यातील बहुतेक शहरांमध्ये कांद्याच्या भावानं अर्धशतकी मजल मारली आहे. त्यामुळं गृहिणींची चिंता वाढली आहे. नवरात्रीच्या दिवसात कांदा खाणं टाळलं जातं. बहुतेक हिंदू कुटुंबांमध्ये या नऊ दिवसांत जेवणात लसूण आणि कांदा वापरला जात नाही. तसंच, मांसाहार देखील केला जात नाही. त्यामुळं कांद्याचा वापर कमी होतो. त्यामुळं नवरात्रीच्या आधी कांद्याचा भाव काहीसा खाली आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा कांद्याचा भाव वधारू लागला आहे. त्यामुळं साठेबाजी वाढून भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कांद्याच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी 25 रुपयांवर विकला जाणारा कांदा आता 50 रुपयांवर गेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरासरी 1000 रुपयांपर्यंत जास्त भाव मिळत आहे.
कांद्याचे दर वाढले मात्र, टोमॅटोचे दर घसरले
दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. कारण, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतच सडून जात होता. दर नसल्यामुळं कांदा विक्रीस नेऊन त्याचा उत्पादन खर्चही निघणं कठीण होतं त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. अशातच आता कांद्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कांद्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी दुसरीकडं टौमॅटो उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. मागच्या दोन महिन्यापूर्वी टोमॅटोचे दर हे प्रतिकिलोसाठी 150 ते 200 रुपयांवर पोहोचले होते. आता मात्र दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या पाच ते दहा रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जात आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

