
NCP Crisis : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा करत अजित पवार यांनी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. तसंच शरद पवार यांच्याकडून सुद्धा निवडणूक आयोगासमोर लेखी उत्तर सादर करण्यात आलं आहे.
आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून या प्रकरणाची सुनावणी होणार असून राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगा समोर शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी, तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मणिंदर सिंह हे बाजू मांडणार आहे.
|
Goregaon Fire : मुंबईत अग्नितांडव! गोरेगावातील ५ मजली इमारतीला भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी |
दरम्यान, शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगासमोर सुमारे ९ हजार प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडूनही ६ ते ७ हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. आज होणाऱ्या सुनावणीत आकड्यांचा विचार करता निर्णय आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास अजित पवार गटाकडून व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे निकाल काहीही लागला तरी संभाव्य परिणामांची चिंता करण्याची गरज नाही, अशी आक्रमक भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. काही लोकांचे निवडणूक चिन्ह बदलण्याचे कारस्थान असू शकते. पण मतदार हे हुशार असतात. निवडणूक चिन्ह बदलले तरी कुठले बटण दाबायचे त्यांना ठाऊक असते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
सुनावणीआधी शरद पवारांना धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला असताना दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून पुन्हा अपात्र झाले आहेत. एकाच वर्षात दोन वेळा अपात्र ठरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केरळ हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्याने लोकसभा सचिवालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




