
Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वडगाव तेजन गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ४ वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र दरोडा पडला आहे.
दरोडेखोरांनी चाकूचा तसेच हत्यारांचा धाक दाखवून लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय. एकाच दिवशी ४ ठिकाणी दरोडा पडल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
पालखी मार्ग शेगाव -पंढरपूर व सुलतानपुर महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वडगाव तेजन येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळीने दहशद माजवली. ग्रामस्थ गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत रस्त्यावर असलेल्या घरावर सशस्त्र हल्ला करीत दरोडेखोरांनी मध्यरात्री वयोवृद्ध शेतकरी रामकिसन रामराव तेजनकर यांच्या घरात प्रवेश केला.
दरोडेखोरांनी पती-पत्नीला बांधून ठेवत दोघांच्याही गळ्याला चाकू लावून घरातील दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला. दाम्पत्याच्या डोळ्यासमोरच दरोडेखोरांनी मुद्देमाल घेऊन पळ काढला. इतक्यावरच हे दरोडेखोर थांबले नाही. तर त्यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या नारायण तुकाराम कुलाल यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करीत घरामधील मौल्यवान वस्तूंची चोरी केली.
|
Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, २ जण जखमी |
याचदरम्यान, जुन्या (वडगाव तेजन) गावांमध्ये राहणाऱ्या विशाल रमेश तेजनकर व इंदुबाई त्रंबक मानवतकर यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारून सोने व रोख रक्कम पसार केली. एकाच रात्री एकाचवेळी चोरट्यांनी सशस्त्र हत्यारांसह टाकलेल्या दरोडयात ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांणी लंपास केल्याची तक्रार रामकिसन रामराव तेजनकर वय ६९ यांनी लोणार पोलीस स्टेशनला दिली आहे.
त्याचप्रमाणे, विशाल रमेश तेजनकर यांच्या घरातील ३२ हजारांची रोख रक्कम अडीच ते तीन तोळे सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. तर इंदुबाई त्र्यंबक मानवतकर यांच्या घरातील २० हजार रुपयांची रोख रक्कम आणि मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान, या दरोड्याची माहिती मिळताच लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिनिश मेहेत्रे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांकडून सध्या दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

