
पुणे : डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी दहा वर्ष पूर्ण होत झाली आहे. या दहा वर्षांमध्ये सीबीआयच्या (CBI) चुकीच्या तपासामुळं पहिली पाच वर्ष दाभोळकरांच्या हत्येचा खटला सुरूच होऊ शकला नाही. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या तपासामुळे दाभोळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. मात्र अजूनही दाभोळकरांच्या हत्येमागचे खरे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. दाभोळकरांच्या हत्येचा कोणताही परिणाम न होऊ देता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम मागील दहा वर्षात आणखी जोमाने वाढलं आहे. दाभोळकरांची पुण्यात जिथे हत्या झाली, त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन अनिसंकडून निर्धार रॅली काढण्यात आली.
अंनिसंच म्हणणं काय?
सूत्रधारांपर्यंत आपण पोहचू शकलो नाही, अशी खंत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आमच्या मनात दु:खाची सल आहे. पण दाभोळकरांच्या हत्येचा सूत्रधार अजूनही सापडला नाही ही देखील सल आमच्या मनात असल्याचं अंनिसने यावेळी म्हटलं आहे. तर दाभोळकरांची हत्या ही पुरोगामी विचारांवर ओरखडा नसून पुरोगामी विचारांवर पडलेला हा एक डाग आहे. म्हणून दाभोळकरांच्या स्मृतीला आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी हा निर्धार मोर्चा काढण्यात आल्याचं अंनिसकडून सांगण्यात आलं आहे.
|
|
दाभोळकरांची हत्या कशी झाली?
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी कायमच अंधेश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता. नेहमीप्रमाणे 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक गेले होते. मॉर्निंग वॉक ओटोपून घरी जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती. शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे अशी मारेकऱ्यांची नावं असल्याचं पुढे तापासातून समोर आलं.
या दोघांनी पाठिमागून दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या. ही सर्व घटना या पुलावर सफाई काम करणाऱ्या दोघांनी आणि इतर काही लोकांनी प्रत्यक्षात पाहिली. त्यामुळे याच पुलावरुन अंनिसकडून निर्धार रॅली काढण्याचा अंनिसने घेतला. दाभोळकरांनी कायमच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला होता. त्यामुळे समाजातून त्यांच्यावर अनेकदा टीका टीपण्णी देखील केली जात होती. त्यामुळेच दाभोळकरांची हत्या झाली असल्याचं म्हटलं जातं.
सुरुवातीलाच तपास चुकीच्या दिशेने
अगदी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेचा तपास होण्यासाठी सुरुवातीलाच चुकीच्या दिशेने झाला. या हत्येचा तपास जेव्हा पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता तेव्हा त्यांनी चुकीच्या आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे गेला. सीबीआयकडून देखील या प्रकरणात चुकीचा तपास झाल्याचं समोर आलं. कारण सीबीआयने कोर्टात दावा केला होती सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांची हत्या केली.
काँब्रेड पानसरे, एम एन कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एआयटी करुन करण्यात येत होता. त्या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एसआयटीच्या निदर्शनास आलं की, हे हत्याकांड करणारा गट एकच आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीच्या तपासामधून उलघडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे या दोघांनी केली आहे. पण हा सगळा उलघडा होण्यासाठी 2018 उजाडलं. त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने होत असल्याने या प्रकरणाचा खटलाच उभा राहिला नाही.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

