Pune : नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी,पुणे महापालिका आयुक्तांकडून निधी मंजूर

Pune - बालगंधर्व रंगमंदिरासह पुणे शहरातील बहुतांश नाट्यगृहांमधील गैरसोयी दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार, सर्व नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. संबंधित कामांच्या निविदा प्रक्रियाही सुरू केल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी भवन विभागाकडून निधीची मागणी केली होती. त्यानुसार, आयुक्तांनी दोन कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे, अशी माहिती क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त चेतना केरुरे यांनी दिली.

बालगंधर्व व अन्य नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठीच्या निविदा काढलेल्या आहेत. त्यासाठी निधी मंजूर केला असून लवकरच या कामांना सुरुवात होईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *