सिल्लोड : महसूल व कृषी विभागाच्या कात्रीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सापडली असून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने राज्याच्या मुख्य सचिवांना या योजनेचे काम संपूर्णपणे बंद करणार असल्याचे मंगळवारी (ता.१५) निवेदन दिले आहे. सामान्य शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने योजना अमलात आणली खरी, परंतु योजनेची कामे करणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महसूल संघटनेमार्फत या योजनेतील कामे करण्यात येत होती. परंतु मागील वर्षभरापासून या योजनेचे काम राज्य अधिकारी संघटनेने बंद केले होते. दोन दिवसांपूर्वी हे काम सुरू करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचे उपआयुक्त विनयकुमार आवटे यांनी या योजनेतील प्रलंबीत कामांची तपासणी करून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. शेतकऱ्यांना या योजनेतील कामे सुरू झाल्यामुळे आनंद झाला होता. परंतु औटघटकेसाठी या योजनेचे काम सुरू झाल्यामुळे आता पुन्हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनदरबारी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.
राज्याच्या तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्राच्या कृषी व कल्याण विभागामार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी त्या त्या राज्याचा कृषी विभागाने करावी असे अपेक्षित आहे. योजनेतील सर्व शासन आदेश, परिपत्रक कृषी विभागाद्वारे निर्गमित करण्यात आलेले असून, अंमलबजावणी प्रमुख म्हणून कृषी आयुक्त आहेत. महाराष्ट्रात मात्र, या योजनेची कार्यवाही महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे. महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यामध्ये सदर योजनेचे पूर्ण कामकाज कृषी विभागानेच केले आहे.
राज्याच्या महसूल व कृषी मंत्र्यांच्या संयुक्त सभेमध्ये २१ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या निर्देशानुसार महसूल विभागाने या योजनेच्या संबंधित असलेली दुरुस्ती व अद्ययावत करण्याचे काम पूर्ण केले आहे. असे असताना सदर सभेमध्ये ठरल्याप्रमाणे कार्यवाही न करता दिलेल्या निर्देशाकडे दुर्लक्ष करून ८ मार्च २०२२ रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत महसूल विभागाकडे निवडणुका, नैसर्गिक आपत्ती, मनरेगा अंमलबजावणी, महाराजस्व अभियान, सातबारा संगणकीकरण, ई-पीक पाहणी, महसूल वसुली, अधिकार अभिलेख संबंधी कामे, पाणीटंचाई अशी अनेक महत्त्वाची कामे सुरू असल्याने महसुलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नियमित कामावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे या योजनेचे काम महसूल विभागाकडून काढून मुळ विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. महसूल कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विचार करून सदर योजनेचे काम संपूर्णपणे बंद करून नाकारण्यात येत आहे, असेही त्यात नमुद करण्यात आले आहे.
महसूल, कृषी विभागात रस्सीखेच
केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून देखिल समाधान व्यक्त होत होते. परंतु मागील वर्षीपासून या योजनेतील कामे महसूल विभागाने बंद केली. काम महसूलचे व पुरस्कार कृषी विभागास मिळाल्यामुळे योजनेच्या कामांना ब्रेक लागला. आता या योजनेतील कामे पुन्हा बंद झाल्याने कामे करणार कोण ? यामुळे राज्याच्या महसूल व कृषी विभागात चांगलीच रस्सीखेच बघावयास मिळणार आहे.हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




