औरंगाबाद : नुसत्याच भिंती असताना छताऐवजी लग्नसमारंभात वापरण्यात येणारा मंडप वापरुन मुलांना बारावीच्या परीक्षेला बसवण्याचे प्रकरण निलजगाव (ता.पैठण) येथील लक्ष्मीबाई शाळेत समोर आले होते. हे प्रकरण ताजे असतानाही चुकीची माहिती देऊन वारंवार सूचना करुनही शाळेने सुधारणा केलेली नाही. दहावीच्या मराठीच्या पहिल्याच पेपरला शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचे समोर आले. याची शहानिशा करत शिक्षण विभाग आणि मंडळाने सादर केलेल्या अहवालानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शनिवारपासून होणारे उर्वरित पेपरसाठीचे केंद्रही बदलण्यात आले आहेत. आता दहावीचे पेपर बोकूड जळगाव येथील सुरेखा शंकरसिंग नाईक विद्यालयात होणार असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा प्रथम राज्यमंडळाने होम सेंटर दिले आहेत. याचाच गैरफायदा शाळा घेताना दिसत असल्याचे चित्र परीक्षेदरम्यान दिसून येत आहे. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला निलजगाव (ता. पैठण) येथील लक्ष्मीबाई विद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव आढळून आला होता. तेथे मुलांना मंडपाखाली परीक्षेला बसवल्याने चुकीची माहिती दिल्याप्रकरणी तुमच्या शाळेची मान्यता का रद्द करण्यात येवू नये, अशी नोटीस शाळेला शिक्षण विभागाने बजावली होती. असे असताना दहावीच्या मराठीच्या पेपरला विषय शिक्षक केंद्रावर विद्यार्थ्याना कॉपी पुरवत असल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसून आले होते.
विषय शिक्षकांनी परीक्षा काळात केंद्रावर हजर राहू नये, असे मंडळाचे आदेश असताना मराठी विषयाचा शिक्षक रोडू शिंदे हे शाळेत होते. तसेच मराठी विषयाचे गाईड घेवून केंद्राजवळ पळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत तातडीने बुधवारी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख, विभागीय सचिव आर.पी. पाटील यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जावून चौकशी करत पाहणी केली. याबाबत संबंधित शाळेतील शिक्षकांनी समाधानकारक उत्तरे दिले नाही. याबाबतचा संपूर्ण अहवाल शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आला असून, त्यांनी कॉपीचा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ज्या शाळा कॉपीला प्रोत्साहन देतील, त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल, असे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. निलजगावच्या या शाळेची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्यात येत आहे. तसेच शाळेला त्यांची बाजू मांडण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला असल्याचे साबळे यांनी सांगितले.हे पण वाचा-
शहर
- शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती, तर संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली;
- शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम
- दिव्यांगांच्या हक्काच्या निधीला प्रशासकीय खो! रायगडमधील रासळ ग्रामपंचायतीविरोधात उद्यापासून दिव्यांगांचे सामूहिक उपोषण
- पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! पुण्यात 'या' दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
महाराष्ट्र
- शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती, तर संदेश केंजळे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली;
- शिरूर : पिंपरखेडच्या सौम्या वरे आणि आयुष केदारीची नवोदय विद्यालयात निवड; मराठी शाळांचा दबदबा कायम
- दिव्यांगांच्या हक्काच्या निधीला प्रशासकीय खो! रायगडमधील रासळ ग्रामपंचायतीविरोधात उद्यापासून दिव्यांगांचे सामूहिक उपोषण
- पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार! पुण्यात 'या' दिवशी धडकणार मान्सून; हवामान विभागाकडून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा
गुन्हा
- मुंबई: बीकेसीमध्ये धावणार देशातील पहिली 'पॉड टॅक्सी'! स्वप्न की वास्तव? प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह.
- बीड हादरले! तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार, फोटो-व्हिडिओच्या जोरावर ब्लॅकमेलिंग; अंबाजोगाई परिसरातील धक्कादायक प्रकार
- पुण्यात थरार! महिलेशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण; दिवेघाटात सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून सुटका.
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
इतर
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
- दैनिक राशिभविष्य ७ जून २०२६: आज कोणत्या राशींवर असेल गणपती बाप्पाची कृपा? जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- भंडारा: वैनगंगा नदीत बोट उलटून दोन तरुणांचा बुडून मृत्यू; पाच जण सुदैवाने बचावले!
- अमेरिका: हैदराबादचा तरुण अंशुल कुंचा याचा 'फेक' पिझ्झा डिलिव्हरीच्या जाळ्यात अडकवून गोळ्या झाडून खून!
- वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रोटोटाइप लांबणीवर; आता डिसेंबर २०२६ मध्ये होणार लोकार्पण!
- नवी दिल्ली: सीबीएसईच्या निकालांच्या पोर्टलवर परदेशातून सायबर हल्ला! केंद्रीय यंत्रणा सतर्क; विद्यार्थ्यांच्या डेटाची सुरक्षा सुरक्षित

























Subscribe to my channel



