औरंगाबाद : महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३९ हजार ७६० घरे उभारण्यासाठी तब्बल चार हजार ६२७ कोटी रुपयांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) राज्य शासनाला सादर केला आहे. त्यामुळे शहरातील बेघरांची अपेक्षा वाढली आहे. मात्र या घरांच्या किमती किती राहतील? कधीपर्यंत घरे मिळतील याविषयी अद्याप अनिश्चितता आहे. केंद्र व राज्य शासनाकडून दिले जाणारे सुमारे अडीच लाखापर्यंतचे अनुदान घराच्या किंमत ठरल्यानंतर त्यातून वजा होतील, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तसेच स्वतःची जागा नसलेल्या सुमारे ८० हजार नागरिकांनी महापालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. मात्र जागे अभावी आवास योजनेचे काम सुरू होऊ शकले नव्हते. खासदार इम्तियाज जलील यांनी पाठपुरावा केल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेऊन जागा देण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात डीपीआर तयार करून सात ठिकाणच्या जागेवर ३९,७६० गाळे बांधण्यासाठी चार हजार ६२७.२८ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे महापालिकेने सादर केला आहे. राज्य शासनाकडून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे.
यासंदर्भात श्री. पांडेय यांनी सांगितले की, ३१ मार्च पूर्वी आवास योजनेचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिकेने जबाबदारी पूर्ण केली आहे. पुढे राज्य सरकार व केंद्र सरकारची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. ही घरे मोफत मिळणार का? अशी विचारणा केली असता, घरांच्या किमती अद्याप ठरलेल्या नाहीत. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील कारवाई होईल, लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाचा फायदा मिळेल.
राज्यातील सर्वांत मोठी योजना
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सरकारी जागेवर हा सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे. इतर महापालिकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झालेले नाही. काही नगरपालिकांमध्ये सरकारी जागेवर गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. पण सुमारे ४० हजार घरांचा प्रस्ताव फक्त औरंगाबादचा आहे.हे पण वाचा-
शहर
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
महाराष्ट्र
- अमरावतीत औद्योगिक प्रदूषणाचा मोठा स्फोट! नांदगावपेठच्या जमिनीत सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड घातक पातळीवर; निरी (NEERI) च्या अहवालानंतर भूसंपादनाचे आदेश!
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य

























Subscribe to my channel




