Pune Crime : घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पत्नीने केले पतीवर चाकूने वार

पुण्यातील कोंढवा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पत्नीने पतीवर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इम्रान खान (४६) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी इम्रानची पत्नी नाझनीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने नाझनीनने इम्रानला घरखर्चास पैसे मागितले होते. इम्रानने पैसे देण्यास नकार दिल्याने नाझनीन आणि इम्रान यांच्यात वाद झाला.

रागाच्या भरात नाझनीने स्वयंपाकघरातील चाकुने इम्रानवर वार केले. यात इम्रान जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इम्रान खानवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. तर अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *