
खेड : पालगड (ता. दापोली) गावाजवळ म्हणजेच दापोली आणि खेड तालुक्यांच्या सीमेवर रामगड नावाच्या एका किल्ल्याचा शोध दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी लावला आहे. त्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि वास्तू रचनेतील शास्त्रीय पुराव्यांवर आधारित प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
पालगडच्या पूर्वेस समुद्रसपाटीपासून अंदाजे ३९० मीटर (१२८० फूट) उंचीवर छोटेखानी किल्ला आहे. स्थानिकांना त्याची माहिती नाही. नव्याने शोधलेल्या रामगड किल्ल्यामुळे ऐतिहासिक वारशाला पुन्हा चालना मिळणार आहे. रामगड हा पालगडचा जोडकिल्ला असून, आजवर या किल्ल्याची स्थान निश्चिती झालेली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. यातील पहिला रामगड हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात, तर दुसरा रामगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली, याविषयी आजतागायत कोणालाच माहिती नाही. मात्र, पालगडबरोबरच हा किल्लादेखील बांधला गेला असावा, असा कयास आहे.
दोन्ही किल्ल्यांच्या बांधणीत अनेक समान दिसतात. किल्ल्याचा उल्लेख असलेली दोन-तीन कागदपत्रे उपलब्ध असून, त्यातील पहिली नोंद १७२८ मधील यादीत आहे. ही यादी ऐतिहासिक संग्रहांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. त्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांचा समावेश आहे. त्यात रामगडचा उल्लेख पालगडबरोबर झालेला असून, तो रामदुर्ग असा येतो. पुढील दोन्ही पत्रे पेशवे दप्तरातील असून, ती अनुक्रमे १७४५ आणि १८१८ मधील आहेत. यातील पहिले पत्र कोणी कोणास पाठवले याचा उल्लेख प्रस्तुत खंडातील प्रसिद्ध लेखात नाही. मात्र, रत्नागिरीमधील रामगड सिद्दीच्या ताब्यात असावा आणि तो सिद्दीवरील मोहिमेत परिसरातील रसाळगडबरोबर पेशव्यांच्या ताब्यात आला असावा, असे पत्रावरून समजते.
हे पत्र मार्च १८१८ मधील असून, इंग्रजी फौजा पालगड व रामगड येथे पहाटेपासून तोफांचा मारा करत असून, किल्ल्यावर लागलेली आग खूप दुरून दिसत असल्याचे त्यात म्हटले आहे. हे पत्र धोंडो विश्वनाथाने निळोपंत पुरंदर यांना पाठवले आहे. त्या पत्रावरून रामगड व पालगड हे दोन्ही किल्ले एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसून येते. पालगड आणि रामगड किल्ल्याभोवती एकूण पाच माच्या असून, रामगड माची किल्ल्याच्या पश्चिमेस असून सध्या ती राणी माची या नावाने ओळखली जाते. किल्ल्याच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रावरून पालगडच्या पश्चिमेकडे एक उंचवटा असून, त्यावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात.
काय आढळते किल्ल्यावर
* आकाराने छोट्या माथ्यावर बांधकाम
* किल्ल्याचा दरवाजा त्याचे २ संरक्षक बुरुज
* चहू बाजूस रुंद तटबंदी, तटबंदीतील ४ बुरुज
* किल्ल्याच्या आतील बाजूस एक सुटा बुरुज
* ६-७ इमारती काही थडगी, भांड्यांचे तुकडे
* तटबंदी व दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत.
ऐतिहासिक दस्तावेजांतील काही नोंदींच्या आधारे महिन्याभरापूर्वी रामगडाचे सर्वेक्षण केले. गावकऱ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांना काहीच माहिती नसल्याचे आढळले. त्यांनी वेगळाच गड दाखवला. अजून खोलात जाऊन संदर्भ तपासून आणि प्रत्यक्ष पाहणीतून शास्त्रीय पुरावे हाती लागले. त्याआधारे रामगड हा दुर्ग असल्याचे स्पष्ट झाले.
- डॉ. संदीप परांजपे, दुर्ग अभ्यासक
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




