
Shivsena News: राज्यात सत्तासंघर्ष झाला एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी बंड केलं आणि सत्तेतून बाहेर पडले. शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपच्या सोबतीने राज्यात नव्याने सत्ता स्थापन केली.
यानंतर शिवसेना हा पक्ष कोणाचा यावर प्रश्न निर्माण झाला हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. या घडामोडी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हं दिलं. त्यानंतर खरी शिवसेना ही शिंदे यांची आहे म्हणत ठाकरे गटाचे अनेक समर्थक आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश करू लागले आहेत.
दरम्यान अंबरनामधील उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुखांपासून शेकडो पदाधिकाऱ्यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रविवारी संध्याकाळी प्रवेश केला.
बंडखोरीनंतर गेले नऊ महिने अंबरनाथ शहर शाखा ठाकरे समर्थकांच्या ताब्यात असताना रविवारी याच निष्ठावंत ठाकरे समर्थकांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे शहर शाखेतून हटवली. त्यामुळे अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचे यांनी एकहाती वर्चस्व मिळवले असून उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
अंबरनाथमधील ठाकरे गटाचे जवळपास सर्वच पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे पदाधिकारी राजीनामे देण्याची शक्यता आहे. यापुढे अंबरनाथमध्ये एकच शिवसेना असेल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलीय.
अंबरनाथचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यापुढे अंबरनाथ शहरात एकच शिवसेना असेल. पूर्वीप्रमाणे सगळे एकत्र काम करतील अशी प्रतिक्रिया दिली.
काय आहे स्थानिक राजकारण?
राज्यात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर अंबरनाथ शहरातील आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा गट पहिल्या दिवसापासून शिंदे यांच्यासोबत होता. मात्र आमदार किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात वितुष्ट असल्यामुळे वाळेकर गट ठाकरे गटातच होता.
काही दिवसांपूर्वी काही पडद्यामागील घडामोडी घडल्या. त्यानंतर अचानक अरविंद वाळेकर आणि त्यांच्या परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आपण शिंदे गटात प्रवेश केल्याचं स्वतःच जाहीर केलं होतं.
मात्र त्यांचे सर्व समर्थक ठाकरे गटातच थांबले होते. इतकंच नव्हे, वाळेकर यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले श्रीनिवास वाल्मिकी यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना थेट शहरप्रमुख पद देण्यात आलं होतं.
वाळेकर गटाच्या प्रवेशाला आमदार किणीकर गटाचा विरोध असल्याचीही चर्चा होती. मात्र अखेर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी या सर्वांशी संवाद साधला आणि वाळेकर गट सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत आला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




