
पिंपरी: पिंपरी-चिंचवडचा कायापालट करूनही महापालिकेची सत्ता हातातून गेली, काहीही करून ती पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा, खरे तर अजित पवार यांचा प्रचंड आटापिटा सुरू आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत शहरात केलेल्या विकासकामांच्या जोरावर पालिकेची सत्ता पुन्हा आम्हीच जिंकू, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांना आहे. पालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत जाणार आहे. हे लक्षात घेऊनच राज्य शासनातील प्रभावी मंत्री व पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी शक्य त्या मार्गाने भाजपची कोंडी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर सुरूवातीपासून अजित पवारांचा प्रभाव आहे. २००२ ते २०१७ पर्यंत अशी सलग १५ वर्षे पिंपरी पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. नेतृत्वाची धुरा अर्थात अजित पवारांकडे होती. पवारांच्या एकाधिकारशाहीमुळे शहरविकासाची अनेक कामे या काळात विनाअडथळा मार्गी लागली. त्याचवेळी, सत्तेचा गैरवापर करत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पालिकेची खाऊगल्ली करून ठेवली. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा अतिरेक झाल्यामुळेच २०१७ च्या पालिका निवडणुकीत शहरवासीयांनी राष्ट्रवादीला नाकारले. भाजपने अजितदादांच्या हातातील पालिकेतील सत्ता खेचून नेली. त्याआधी जेमतेम तीन नगरसेवक असणाऱ्या भाजपने एकदम ७७ जागा जिंकल्या. पाच अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला साथ दिली. दुसरीकडे, प्रबळ पक्ष म्हणवणाऱ्या राष्ट्रवादीला ३६ जागांवरच समाधान मानावे लागले. बारामतीखालोखाल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या िपपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. बारामतीकरांच्या तालमीत तयार झालेले आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनीच पवारांना धूळ चारली. अजित पवारांना हा मोठा धक्का होता.
त्यापाठोपाठ, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून सव्वा दोन लाख मतांच्या फरकाने पराभव झाला. या दोन्ही राजकीय झटक्यांमुळे अजित पवार कमालीचे व्यथित झाले होते. ज्या शहरात वैयक्तिक लक्ष देऊन आपण इतक्या मोठय़ा प्रमाणात कामे केली, त्याच शहरवासीयांनी आपल्याला व मुलाला सपशेल नाकारले, याचे पवारांना दु:ख झाले होते. परिणामी, त्यानंतर बराच काळ ते पिंपरी-चिंचवडकडे फिरकले नाहीत. अजित पवारांची ही नाराजी अजूनही कायम असल्याचे अनेक दाखले दिले जातात.
पालिकेवर नियंत्रण राज्यात सत्ताबदल झाल्यावर उपमुख्यमंत्री व पालकमंत्री या नात्याने अजित पवारांनी पिंपरी पालिकेवर बरेच नियंत्रण ठेवले आहे. त्यातून भाजपची अडवणूक करण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धोरण वेळोवेळी दिसून येते. भाजपला राजकीय फायदा होईल, असे निर्णय आयुक्तांनी टाळलेच. आयुक्तांवर अजित पवारांचा दबाव असल्याचा आरोप भाजपचे महापौर व आमदारांनी वारंवार केला. करोना काळात शहरवासीयांना मोठे नुकसान झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी दिलासा म्हणून शहरातील नागरिकांना सरसकट सहा महिन्यांचा मिळकतकर माफ करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला. त्यास राज्यशासनाने शेवटपर्यंत परवानगी दिली नाही. त्यामागे पवारांचे राजकारण असल्याचे मानले जाते. गरीब प्रवर्गातील सुमारे ५० हजार कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला. मात्र, भाजपला अनुकूल वातावरण होईल, या कारणास्तव पवारांनी आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ दिली नाही, असा भाजपचा आरोप आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपचे हे आरोप मान्य नाहीत. प्रशासकीय राजवटीत सारे निर्णय हे अजितदादांच्या कलाने घेतले जात असल्याची टीका सुरू झाली आहे.
शहर
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- महाराष्ट्र: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भीषण स्फोट; महाराष्ट्राचे दोन सुपुत्र हुतात्मा.
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
गुन्हा
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?























Subscribe to my channel


