तीन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माला वगळणार का? सुपर 8 फेरीपूर्वी कोच म्हणाला..Image Credit source: Francois Nel/Getty Images
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळावायचं असेल तर चांगली कामगिरी करणं भाग आहे. अन्यथा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. असं असताना भारताचा पहिलाच सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघाशी लढत वाटते तितकी सोपी नाही. त्यामुळे या सामन्यात भारताला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. असं असताना अभिषेक शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. साखळी फेरीतील तीन सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे सुपर 8 फेरीत असंच सुरू राहिलं तर भारताची डोकेदुखी वाढेल. साखळी अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात खातही खोलता आलं नाही. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान द्यायचं की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारताचा गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मोर्केलने याबाबत मोठी अपडेट दिली आहे.
काय म्हणाले मोर्ने मोर्केल?
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 फेरीपूर्वी मोर्ने मोर्केल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याला अभिषेक शर्माच्या फ्लॉप शोबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा मोर्केलने स्पष्ट सांगितलं की, संघ व्यवस्थापन अभिषेक शर्मासोबत आहे. अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मबाबत कोणतीही चर्चा नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो चांगली कामगिरी करेल. मोर्केल म्हणाला की, ‘तीन शून्यांची चिंता करू नका. तो वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. नेटमध्ये चेंडूंवर योग्य पद्धतीने प्रहार करत आहे.’ मोर्ने मोर्केलच्या या विधानातून एक गोष्ट स्पष्ट आहे की, अभिषेक शर्मा दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 भाग असेल.
अभिषेक शर्माची जागा घेण्यास संजू सॅमसनचा पर्याय आहे. पण त्याचीही बॅट हवी तशी चालत नाही. त्यात अभिषेक शर्मा असला तरी प्रतिस्पर्धी संघांना धडकी भरते. त्याने 41 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1297 धावा केल्या आहेत. त्यात अभिषेक शर्मा आजारी असल्याने त्याला सहानुभूतीही आहे. रिकव्हर होण्यास वेळ लागू शकतो असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण तीनवेळा शून्यावर बाद झाल्याने मानसिकतेवरही परिणाम होते. त्यामुळे त्याचा आक्रमक अंदाज दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पाहायला मिळेल की सावध खेळी करेल हे सांगणं कठीण आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




