पुणे : बनावट एनए ऑर्डर (बिगरशेती प्रमाणपत्र) आणि भोगवटापत्र तयार करून शेकडो सदनिकांची नोंदणी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बड्या अधिकाऱ्यांच्या नावाने ६७ बनावट ‘एनए ऑर्डर’, तर महापालिकेच्या नावावर ३७ बनावट भोगवटा पत्र अशा सुमारे शंभरहून अधिक केसेस तपासणीत आढळून आल्या आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून अशा प्रकारे बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदा बांधकामातील सदनिकांची दस्तनोंदणी करून घेण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
यूएलसीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून बांधकाम परवानगी घेण्यात आल्याचे प्रकरण यापूर्वी २००४-५ मध्ये उघडकीस आले होते. या प्रकाराने बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. तर काही अधिकाऱ्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर बनावट स्टॅम्प पेपरचे प्रकरण उघडकीस आले. आता बनावट ‘एनए ऑर्डर’ व ‘भोगवटा प्रमाणपत्रा’चे प्रकरण उघडकीस आले. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारी आणि त्या निमित्ताने करण्यात आलेल्या दफ्तर तपासणीतून हा सर्व प्रकार उघडकीस आला.
बांधकामाला शिस्त लावण्यासाठी पाच वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून रेरा कायदा लागू केला. रेराकडे नोंदणी केलेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम परवानगी घेतलेल्या सदनिकांच्या दस्तांची नोंदणी सध्या केली जाते. अनधिकृत बांधकामातील सदनिकांची नोंदणी गेल्या वर्षापासून पूर्णपर्ण बंद करण्यात आली. उपनगराच्या भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली. अशा बांधकामातील दस्तांची नोंदणी बंद झाल्यामुळे काही हजार सदनिका पडून आहेत. हजारो नागरीक अडकून पडले आहेत. एवढेच नव्हे, अशा अनधिकृत बांधकामांमध्ये राजकीय क्षेत्रातील काही बड्यांचे पैसे अडकून पडले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन सदनिकांची दस्तनोंदणी करून घेण्यात आल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांकडे देखील तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्रशासकीय सेवेतील बड्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून या ऑर्डर तयार केल्यामुळे प्रशासकीय पातळीवरदेखील त्यांची गुप्तता पाळली जात आहे.
दफ्तर तपासणीचे काम सुरू
प्रामुख्याने पुणे शहरात अशा प्रकारे बनावट कागदपत्र सादर करून दस्तांची नोंदणी करण्यात आली. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दफ्तर तपासणीचे काम नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.
पदावर नसलेल्यांची स्वाक्षरी
गेल्या सहा महिन्यांत झालेल्या दस्तांना बनावट एनए ऑर्डर जोडण्यात आल्या. त्यापैकी काही ऑर्डरवर सेवानिवृत्त झालेले आयएएस अधिकारी, तर काहींवर सध्या प्रशासकीय सेवेत अतिवरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. ऑर्डरवरील तारीख पाहिल्यानंतर त्या तारखेला हे अधिकारी त्याच पदावरच होते का, याची तपासणी केल्यानंतर त्यांनी या पदावर कधीच काम केले नसल्याचे दिसून आल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.
दोन प्रकारे बनाव
- बनावट ‘एनए ऑर्डर’ - ६७
- पालिकेच्या नावावर बनावट भोगवटा पत्र - ३७
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




