Bollywood Movies : हिंदी चित्रपटसृष्टीत जितका नायक महत्त्वाचा असतो तितकाच प्रभावी खलनायकही आवश्यक असतो. नायकाच्या धैर्याची आणि ताकदीची खरी कसोटी तेव्हाच लागते जेव्हा त्याच्यासमोर उभा असलेला खलनायक अंगावर काटा आणणारा असतो. बॉलिवूडमध्ये अमजद खान यांनी साकारलेला ‘गब्बर’, अमरीश पुरी यांचा ‘मोगॅम्बो’, तसेच प्राण, डैनी डेन्जोंगपा आणि गुलशन ग्रोवर यांसारख्या कलाकारांनी खलनायकाच्या भूमिकेतून इतिहास घडवला आहे. विशेषतः शोले मधील गब्बर आजही सर्वात भयानक खलनायकांपैकी एक मानला जातो. मात्र 1998 साली आलेल्या एका चित्रपटात असा खलनायक पाहायला मिळाला ज्याने तब्बल 14 सुपरस्टार्सवर एकहाती छाप टाकली.
27 नोव्हेंबर 1998 रोजी प्रदर्शित झालेला ‘चाइना गेट’ हा दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा मल्टिस्टारर चित्रपट होता. या चित्रपटात एकूण 15 दिग्गज कलाकार झळकले होते. यात अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, डैनी डेन्जोंगपा, ओम पुरी, परेश रावल, कुलभूषण खरबंदा, टीनू आनंद, अनुपम खेर, ममता कुलकर्णी आणि उर्मिला मातोंडकर यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.
इतक्या मोठ्या स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांच्या मनावर सर्वाधिक दहशत निर्माण करणारे पात्र म्हणजे डाकू ‘जगीरा’. ही भूमिका अभिनेता मुकेश तिवारी यांनी साकारली होती. जगीराच्या एंट्रीपासूनच त्याचा खौफ पडद्यावर जाणवत होता. अनेक प्रेक्षकांना त्याचा अभिनय पाहून गब्बरची आठवण झाली. मात्र जगीराची क्रूरता आणि सादरीकरणाची शैली पूर्णपणे वेगळी होती.
मुंबईला जाण्यासाठीही नव्हते पैसे
या भूमिकेमागची कहाणी तितकीच रोचक आहे. मुकेश तिवारी यांना या चित्रपटासाठी कॉल आला तेव्हा त्यांच्या जवळ मुंबईला जाण्यासाठीही पैसे नव्हते. मित्राच्या मदतीने ते ऑडिशनसाठी पोहोचले. भूमिकेत पूर्णपणे रस आणि खरा वाटण्यासाठी त्यांनी तब्बल 50 दिवस अंघोळ केली नव्हती, जेणेकरून ते खऱ्या अर्थाने रानटी आणि धोकादायक डाकूसारखे दिसावेत. सेटवर दुर्गंधी टाळण्यासाठी परफ्युमचा वापर केला जात होता. इतकेच नाही तर त्यांच्या लूक आणि वासामुळे शूटिंगदरम्यान घोडाही बेकाबू झाल्याची चर्चा आहे.
गाणी आणि बॉक्स ऑफिस
या चित्रपटातील ‘छम्मा-छम्मा’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. तसेच जगीराचा डायलॉग ‘मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सुमारे 9.25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 22.30 कोटी रुपयांची कमाई केली होती.
शहर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- मुंबई: महिला उद्योजिकांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! पर्यटन व्यवसायासाठी मिळणार १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
महाराष्ट्र
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- मुंबई: महिला उद्योजिकांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा! पर्यटन व्यवसायासाठी मिळणार १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
























Subscribe to my channel




