
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मांडवगण फराटा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. येथे सत्ता परिवर्तन झाले असून राष्ट्रवादीच्या ताब्यातील असलेली सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश आले आहे. या निवडणुकीत भाजपचे दादा पाटील फराटे यांच्या पॅनेलने थेट सरपंचपद तसेच ११ विरुद्ध ६ अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. दादा पाटील फराटे यांच्या सूनबाई समीक्षा मदन कुरुमकर (फराटे) यांची थेट जनतेतून सरपंचपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत सपशेल हार मानावी लागली असून आमदार अशोक पवार यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे. मांडवगण फराटा ही शिरूर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदासाठी १७ व थेट सरपंच पदासाठी अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक पार पडली.
शिरूर तहसील कार्यालयात सकाळी साडेदहाच्या सुमारास मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. या वेळी दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. यात समीक्षा फराटे कुरुमकर या थेट सरपंच पदाच्या उमेदवार पहिल्या पासून आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सरपंच पद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असल्याने प्रथमच महिलांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. थेट सरपंच पदासाठी घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, घोडगंगाचे संचालक सुधीर फराटे इनामदार यांच्या नेतृत्वाखालील शिवशक्ती ग्रामविकास पॅनल कडून समीक्षा अक्षय फराटे कुरुमकर तर श्री वाघेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनल कडून शीतल सचिन जगताप यांच्यामध्ये सरळ लढत झाली होती. दादा पाटील फराटे, सुधीर फराटे इनामदार यांनी प्रचाराची धुरा सांभाळत पॅनल ची बांधणी केली होती. सत्ताधारी पॅनल च्या उमेदवाराचा अक्षरशः धुव्वा उडाला असून किशोर फराटे, माजी उपसरपंच सुभाष फराटे या मातब्बर उमेदवाराना पराभवाचा सामना करावा लागला. निकालानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
तालुक्यातील मांडवगण फराटा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. यापुर्वी भाजपचे दादा पाटील फराटे व शिवसेनेचे सुधीर फराटे यांनी गावच्या सोसायटीवर विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याने स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पिछेहाट झाली आहे. यामुळे आगामी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर हा विजय महत्वाचा मानला जात आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतही मांडवगण, इनामगाव आणि वडगाव रासाई गटात मतदारांनी अशोक पवारांपेक्षा दादा पाटील फराटे यांना जास्त मताधिक्य दिले होते. तसेच आताही ग्रामपंचायत निवडणुकीत दादा पाटील फराटे यांच्या पॅनलला बहुमत देऊन मतदारांनी दादा पाटील फराटे आणि सुधीर फराटे यांच्या नेतृत्वाला साथ दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


