
लोणावळा : लोणावळा परिसरात एका बंगल्यातील जलतरण तलावात बुडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी घडली. हानियाझैरा मोहम्मददिन सैय्यद असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत हानियाझैराचे वडील मोहम्मददिन (वय ३१, रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सैय्यद कुटुंबीय आणि नातेवाईक लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. लोणावळ्यातील प्रिसली हिल भागात त्यांनी कार्निवल व्हिला बंगला भाडेतत्वावर घेतला होता.
रविवारी सकाळी सैय्यद कुटुंबीय बंगल्यात नाश्ता करत होता. त्या वेळी बंगल्यातील जलतरण तलावाच्या परिसरातून ओरडण्याचा आवाज आला. सय्यद कुटुंबीयांनी जलतरण तलावाच्या दिशेेने धाव घेतली. तेव्हा तलावातील पाण्यात हानियाझैरा पडल्याचे आढळून आले. तिला पाण्यातून बाहेर काढून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. तिच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मूत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करत असून चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
लोणावळा परिसरातील बंगल्यात जलतरण तलावात बुडून बालकांचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. पुणे-मुंबईतील अनेक पर्यटक सुट्टीत लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येतात. लोणावळा भागातील बंगले भाडेतत्वावर घेण्यात येतात. बंगल्यातील सुरक्षाव्यवस्थेकडे बंगला मालक फारसे लक्ष देत नाहीत. सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे काणाडोळा केल्याने जलतरण तलावात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्याने लोणावळा शहर पोलिसांनी बंगला मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले हाेते.
लोणावळा भागात मुंबई-पुण्यातील अनेकांचे बंगले आहेत. लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना बंगले भाडेतत्वावर देण्यात येतात. बंगल्यात जलतरण बांधण्याची परवानगी नगरपरिषदेकडून मिळवावी लागते. लोणावळ्यातील अनेक बंगले मालकांनी जलतरण बांधण्यास परवानगी घेतली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




