पुणे : हडपसर भागातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला

पुणे : शिवाजी सुभाष शेळके (वय २२, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवाजी दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शिवाजी बेपत्ता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता.

साडेसतरा नळी परिसरातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. मध्यरात्री दीडच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. शिवाजीच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *