
पुणे : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आणि पुण्यात क्लासच्या बेकायदेशीर इमारतीवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता 'आर.सी.सी. मोटेगावकर क्लासेस'ने (RCC Motegaonkar Classes) सोशल मीडियावर एक नवी जाहिरातबाजी सुरू केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जेईई (JEE) परीक्षांच्या निकालानंतर क्लासने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, "मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, आम्ही त्यांना दुसऱ्या क्लासमध्ये विलीन (Merge) करू," असा अजब दावा केला आहे. पुण्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या नामांकित क्लासेसकडे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट होत असून यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळती आहे.
नेमका प्रकार काय? नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सीबीआयने (CBI) मोटेगावकर क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना अटक करून दिल्लीला नेले आहे. याशिवाय, पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरातील ज्या इमारतीमध्ये हा क्लास चालवला जात होता, ती इमारत 'भोगवटा पत्र' (Occupancy Certificate) नसताना गेल्या चार वर्षांपासून बेकायदेशीरपणे वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. पुणे महापालिकेने या इमारतीला तब्बल ३ कोटी २० लाखांचा मिळकत कर लावत इमारत सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.
मुख्य संचालक तुरुंगात असल्याने आणि पुण्यातील इमारत सील होण्याच्या मार्गावर असल्याने इथे प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे धाबे दणाणले आहेत. लाखो रुपयांची फी भरून मुलांचे भविष्य अंधारात पाहावे लागत असल्याने पालक प्रचंड चिंतेत आहेत.
जाहिरातीमुळे पालकांचा संताप अनावर अशा कठीण परिस्थितीत पालकांना धीर देण्याऐवजी किंवा फी परत करण्याबाबत बोलण्याऐवजी, मोटेगावकर क्लासकडून सोशल मीडियावर अत्यंत व्यावसायिक पद्धतीने जाहिरातबाजी केली जात आहे. "आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, त्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या क्लासच्या बॅचमध्ये वर्ग (Merge) केले जाईल," असे मेसेज फिरवले जात आहेत.
या संतापजनक भूमिकेमुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "आम्ही मोटेगावकर क्लासच्या नावावर आणि विश्वासावर लाखो रुपये भरले होते, मग आता आमच्या मुलांना दुसऱ्या कोणत्यातरी अनोळखी क्लासमध्ये का पाठवायचे? आमच्या पैशांचे आणि मुलांच्या मानसिक स्थितीचे काय?" असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. यावरून शैक्षणिक संस्थांचा नफेखोर आणि बेजबाबदार चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून अशा संस्थांवर प्रशासनाने कडक कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करत विद्यार्थ्यांचे पैसे सुरक्षित ठेवावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
- शिर्डी: श्रद्धेच्या नावाखाली मोठी फसवणूक! पूजेच्या साहित्यात सापडले चक्क प्लास्टिकचे बदाम; नगरपरिषदेची तातडीने धडक कारवाई!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




