
Beed : सण-उत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणांच्या उत्साहाचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाली. बीड-शिरूर रोडवरील नागऱ्याची वाडी परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण कार अपघातात बीड शहरातील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
बीड शहरातील रामतीर्थ परिसरातील रहिवासी असलेला कृष्णा जालिंदर मुळे (वय २२) हा आपल्या काही मित्रांसोबत धुलिवंदन साजरा करण्यासाठी शेजारील जिल्ह्यातील एका रिसॉर्टवर जाण्याचे नियोजन करून निघाला होता. या सहलीसाठी मित्र परिवाराने व्हेरना आणि थार अशा दोन अलिशान गाड्यांचा वापर केला होता.
सोमवारी पहाटेच्या सुमारास हे सर्व जण बीडहून शिरूर कासारमार्गे निघाले होते. प्रवास सुरू असताना नागऱ्याची वाडीजवळ पोहोचल्यावर व्हेरना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, चालकाचे नियंत्रण सुटल्याबरोबर कारने रस्त्यावरच तीन ते चार पलट्या खाल्ल्या. अनियंत्रित झालेली ही कार शेतातील एका विहिरीच्या दिशेने वेगाने गेली. विहिरीच्या सिमेंटच्या कठड्याला जाऊन जोरदार धडकली आणि कठड्याला लटकली.
एकाचा मृत्यू, तिघे गंभीर
या भीषण धडकेत कृष्णा जालिंदर मुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत कारमध्ये असलेले प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक मित्र असे तिघेजण जखमी अवस्थेत पडले होते. त्यांच्या पाठीमागून 'थार' गाडीत येत असलेल्या मित्रांनी अपघात पाहताच तात्काळ धाव घेतली आणि जखमींना गाडीबाहेर काढले.
जखमींपैकी प्रसाद खोले याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर यश पेंढारे आणि त्यांच्या दुसऱ्या एका मित्रावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार विहिरीच्या कठड्यावर लटकली
हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. मात्र, नशिबाने कार विहिरीच्या कठड्याला धडकून थांबली. जर कार कठडा तोडून थेट विहिरीत कोसळली असती, तर पाण्याची खोली आणि अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता होती. विहिरीच्या कठड्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी एका तरुणाला मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.
परिसरात शोककळा
कृष्णा मुळे याच्या निधनाची बातमी बीड शहरात आणि विशेषतः रामतीर्थ परिसरात समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. धुलिवंदनाचा सण असतानाच एका तरुण मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



