जातीयवादापासून अलिप्त ठेवता येईल असे जीवनाचेकोणतेच क्षेत्र असू शकत नाही का? हा प्रश्न महात्मागांधींनी 1940 मध्ये प्रस्तावित ‘बॉम्बे पेंटांगुलर'' क्रिकेटस्पर्धेबद्दल विचारला होता. धार्मिक समुदायांच्याआधारावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्याकल्पनेमुळे गांधीजी अत्यंत अस्वस्थ होते. प्रसिद्ध ‘बॉम्बेक्वाड्रँगुलर'' स्पर्धेची सुरुवात युरोपीय व पारशीसंघांमधील सामन्याने झाली होती. नंतर त्यात हिंदू व मुस्लिम संघांचाही समावेश झाला. ही विभागणीसंपुष्टात यावी, अशी गांधीजींची इच्छा होती. अखेर1946 मध्ये पेंटांगुलर स्पर्धा बंद करण्यात आली. गांधीजींच्या वरील प्रश्नाला सुमारे 86 वर्षे उलटून गेली.पण आजही तो प्रश्न तितकाच प्रासंगिक वाटतो. भारतीय क्रिकेटच्या मोठ्या यशांपैकी एक यश हे राहिले आहेकी, ते धार्मिक आणि प्रादेशिक विभाजनांच्या पलीकडे जाण्यात यशस्वी ठरले. तरीही मोहम्मद शमी, सरफराजखान आणि आता मोहम्मद सिराज यांना संघाबाहेरठेवल्यानंतर मुस्लिम क्रिकेटपटूंसोबत वेगळी वागणूकदिली जात असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. हेसांगायला मला संकोच वाटत नाही की,न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्याअंतिम अकरा संघातून सिराजला बाहेर ठेवणे हाक्रिकेटच्या दृष्टीने संशयास्पद निर्णय होता. ते भारताच्याविश्वासार्ह वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिले आहेत.विशेषतः परदेशी परिस्थितीत. त्यांना संघाबाहेरठेवण्याच्या निर्णयावर संघ व्यवस्थापनानेक्रिकेटप्रेमींसमोर ठोस स्पष्टीकरण द्यायला हवे. काँग्रेसखासदार इम्रान मसूद यांनी म्हटले आहे की, सिराजचीधार्मिक ओळख हेच त्यांना संघाबाहेर ठेवण्याचे कारणआहे. हा एक गंभीर आरोप आहे. त्यासाठी ठोसपुराव्यांची गरज आहे. निवडीचा संशयास्पद निर्णयआपोआप जातीय निर्णय बनत नाही. बीसीसीआयने याप्रकरणातील संशयाची जबाबदारी स्वीकारायला हवी.जगातील हे सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अजूनही अत्यंतअपारदर्शक पद्धतीने काम करते. एका खेळाडूचीदुसऱ्याच्या ऐवजी निवड का केली गेली? फॉर्म,फिटनेस, कामाचा ताण आणि संघाची रचना याबाबतकाय विचार केला गेला? शानदार कामगिरीचा विक्रमअसलेल्या अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर का ठेवलेजाते? हे असे प्रश्न आहेत. त्यांची अधिक स्पष्ट उत्तरेदिली गेली पाहिजेत. स्वतंत्र भारताने क्वाड्रँगुलर आणि पेंटांगुलरच्या जातीयमॉडेलपासून जाणीवपूर्वक अंतर राखले. रणजी करंडकही प्रमुख देशांतर्गत स्पर्धा बनली. त्यात संघ धार्मिकसमुदायांऐवजी राज्यांचे प्रतिनिधित्व करत होते. नंतरनिवडीची विभागीय प्रणाली आली. ती 1950 च्यादशकापासून ते 1970 च्या दशकापर्यंत भारतीयक्रिकेटवर प्रभाव गाजवून राहिली. तिचा आधारप्रादेशिक प्रतिनिधित्व हा होता. या व्यवस्थेच्या स्वतःच्यामर्यादा होत्या. पण धर्म हा संघांच्या बांधणीचा आधारराहिला नव्हता. इफ्तिखार अली खान पतौडी यांनी 1946मध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले होते. त्यांचे पुत्र मन्सूरअली खान पतौडी हे भारताच्या सर्वात आदरणीयकर्णधारांपैकी एक बनले. गुलाम अहमद हे प्रतिष्ठितकर्णधार होते. मोहम्मद अझहरुद्दीन यांनी अनेक वर्षेभारतीय संघाची धुरा सांभाळली. या नियुक्त्या भारताचीधर्मनिरपेक्ष प्रतिमा दाखवण्यासाठी केवळ प्रतीकात्मकम्हणून केल्या गेल्या नव्हत्या. हे गुणवत्तेच्या जोरावरसंघात स्थान मिळवणारे क्रिकेटपटू होते. झहीर खान,इरफान-युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, मुनाफ पटेलयांसारख्या खेळाडूंनीही अत्यंत दिमाखात भारतीय जर्सीपरिधान केली आहे. धार्मिक ओळखीच्या पलीकडेजाऊन ते केवळ एक भारतीय क्रिकेटपटू होते. ही बाबदेशाचे प्रतिनिधित्व करणारी होती. असेच असायलाहीहवे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) निवडीचा कोणताही संशयास्पद निर्णयआपोआप जातीय निर्णय ठरत नाही.तथापि, बीसीसीआयने या प्रकरणातूननिर्माण झालेल्या संशयाची काहीशीजबाबदारी स्वीकारायला हवी. हे बोर्डअत्यंत अपारदर्शक पद्धतीने काम करते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- पुणे: राक्षेवाडीत काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बसला ओव्हरटेक करताना एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद!
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दुष्काळामुळे वारणेचे कृषी प्रदर्शन आणि कुस्ती मैदान रद्द; पशुधन वाचवण्यासाठी चारा योजना व पीएमआर प्रकल्पाची घोषणा!
- पुणे: कोर्टाबाहेर मंदार किवळेला संपवणाऱ्या ७ आरोपींची नावे समोर; अक्षय चव्हाण मास्टरमाईंड, रात्रीपासूनच आंबेगावात दबा धरून होते!
- पुणे: विमानतळावर पिकअप-ड्रॉप लेनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबाल तर ५०० रुपये दंड; १ डिसेंबरपासून नवा नियम लागू!
- कोल्हापुर: परप्रांतीय वॉचमनकडून १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; राजारामपुरी पोलिसांकडून संशयितास अटक!
गुन्हा
- पुणे: शिवाजीनगर कोर्टाबाहेर १२० सेकंदांत थरार; पहिला प्लॅन फसल्यानंतर कोयत्याने सपासप वार, मंदार किवळेवर प्राणघातक हल्ला!
- जळगाव: पाटील कुटुंबातील ६ जणांना कालव्यात फेकलं; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता आणि १३ वर्षीय मुलाने सांगितला थरार!
- ठाणे: शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; भिवंडी महापालिकेकडून संबंधित दुकान सील व टपरी जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल!
- पुणे: प्रेमविवाहाला कुटुंबांची पसंती, पण संशयाने घात केला! हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा प्रियकराकडून मृत्यू; आरोपी ताब्यात
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!

























Subscribe to my channel




