पुणे: जेजुरी–मोरगाव रस्त्यावर माऊलीनगर परिसरात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी एसटी बसने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नीचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात महेंद्र पोपट नाझीरकर (वय ३५) आणि त्यांची पत्नी रेश्मा महेंद्र नाझीरकर (वय ३२) यांचा मृत्यू झाला असून, दोघेही नाझरे कडेपठार येथील खैरेवस्ती (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील रहिवासी होते. या दाम्पत्याला एक १० वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी असून, त्यांच्या अकाली निधनाने दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
सकाळी ७:४५ वाजता माऊलीनगर येथे भीषण धडक
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महेंद्र नाझीरकर आणि रेश्मा नाझीरकर हे दोघेही नाझरे येथून दुचाकीवरून जेजुरीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास माऊलीनगर येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर जेजुरीहून मोरगावकडे जाणारी पुणे–बारामती नॉनस्टॉप इलेक्ट्रिक एसटी बस त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडकली.
ही धडक इतकी भीषण होती की, मयत पती-पत्नीसह दुचाकी सुमारे २० ते २५ फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात दोघांच्याही डोके, हात आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
चालकावर गुन्हा दाखल; पोलिसांकडून चालक ताब्यात
या प्रकरणी बस चालक अनिल जिवाजी अडसूळ (वय २५, रा. इटकूर, ता. कळंब, जि. धाराशिव) याच्याविरुद्ध रस्ता वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा, निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने वाहन चालवून ओव्हरटेक करत विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन धडक देत दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मयताचा भाऊ चिमाजी नाझीरकर यांनी याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करीत आहेत. अपघाताच्या घटनेनंतर नाझरे कडेपठार, खैरेवस्ती आणि जेजुरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
- नवी मुंबई: आगीचा तांडव! सानपाड्यातील सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला
महाराष्ट्र
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
- नंदुरबार: भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचा चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला; ७ वर्षीय शिवांश अतिदक्षता विभागात दाखल, नागरिकांत संताप!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



