पुणे: नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यातील शिवाजीनगर येथील प्रसिद्ध जे. एम. रोड खाऊ गल्लीत मोठी धडक कारवाई केली आहे. या विशेष तपासणी मोहिमेत एकूण १७ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये वैध नोंदणी किंवा परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्या आणि अस्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या आठ आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर सहा आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तसेच विना नोंदणी व्यवसाय करणाऱ्या आठ व्यावसायिकांना प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे एकूण दोन लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागातील झोन दोनच्या पथकाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी जे. एम. रोड खाऊ गल्ली, जंगली महाराज मंदिरासमोरील परिसर आणि एन. सी. आर. हॉटेल परिसरात ही विशेष मोहीम राबवली. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर ही कठोर कारवाई करण्यात आली.
विना नोंदणी व्यवसाय; आठ ठिकाणी टाळे वैध अन्न परवाना किंवा नोंदणी नसताना व्यवसाय चालवणाऱ्या श्रीनाथ पिझ्झा अँड सँडविचेस, राज चायनीज फास्ट फूड, हिंदवी स्वराज्य, एव्हरेस्ट मोमोज, जय मल्हार भुर्जी सेंटर, शोरमा सेंटर, उत्कर्ष मंडळ लव्ह ज्यूस पॉईंट आणि साई ज्यूस, मिल्कशेक अँड सरबत सेंटर या आठ आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. या सर्व आठ व्यावसायिकांवर प्रत्येकी ३० हजार रुपयांप्रमाणे एकूण २.४० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
अस्वच्छतेचा ठपका; सहा परवाने निलंबित स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमित कुमार, जे. एम. वडापाव स्नॅक्स, हॅप्पी फॅमिली रेस्टॉरंट, श्री सद्गुरू हिंदवी स्वराज्य स्पेशल तुपातील साबुदाणा वडे, जे. एम. पावभाजी कॉर्नर आणि श्री कृष्णा दिल्ली चाट अँड पाणीपुरी सेंटर या सहा आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय, हॅप्पी फॅमिली चिकन शोरमा रोल हाऊस आणि पार्थ अंडा भुर्जी सेंटर या आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तपासणीत उघड झालेल्या गंभीर त्रुटी तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. तयार अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे, तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर करणे, चटण्या आणि सॉस अस्वच्छ स्थितीत साठवणे तसेच खाद्यपदार्थांवर तयार केल्याची आणि मुदत संपण्याची (expiry/best before) तारीख नसणे अशा बाबी आढळल्या. कामगारांचे ॲप्रन आणि हातमोजे अस्वच्छ होते. तसेच कामगारांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे, पाणी व अन्न तपासणी अहवाल आणि कच्च्या मालाच्या खरेदीच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या. अन्न तयार करण्याच्या जागेजवळ उघड्या कचराकुंड्या, अस्वच्छ फरशी आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची अपुरी व्यवस्था आढळून आली.
सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकले आणि सहाय्यक आयुक्त एस. आय. हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. डी. मगर, एस. आर. घोडके, आर. मते, एम. आर. बटुले आणि ए. एस. उमाप यांच्या पथकाने ही कारवाई केली. आवश्यक सर्व नियमांची पूर्तता केल्याशिवाय कोणत्याही व्यवसायिकाने व्यवसाय पुन्हा सुरू करू नये, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
शहर
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
- मुंबई: शायना एनसींकडून चुकून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने राजकीय वादंग; किशोरी पेडणेकर यांचा तीव्र संताप!
- पुणे: भिडू, झाडे लावा रे.. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या खास स्टाईलिश घोषणेने गाजले पुणे! जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात राबवले वृक्षारोपण अभियान
महाराष्ट्र
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा

























Subscribe to my channel




