गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना

गोंदिया: गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गोंदिया तालुक्यातील कामठा-नवरगाव नदी पुलाजवळ तीन जण संशयास्पद स्थितीत आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ उदमांजराचे मृत तिन पिल्ले आढळले. तसेच त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्यासह आणखी तीन जणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. वन अधिकाऱ्यांनी या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आली.

आरोपींजवळ आढळले शस्त्र

येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत गोंदिया सहवनक्षेत्रात येत असलेल्या कामठा सोमवारी (दि. १६) सकाळी ७ वाजताच्या दरम्यान क्षेत्र सहायक एम. डब्ल्यु. भांडारकर व त्यांचे अधिनस्त बीटरक्षक नियमित गस्त करीत असताना कामठा नवरगाव नदीपुलाजवळ तीन व्यक्ती संशयास्पदरित्या हातामध्ये काठ्या घेऊन दिसले व काठ्यांवर लोखंडी टोकदार सुऱ्या घेऊन आढळले. तेव्हा वनअधिकारी यांनी त्यांच्या जवळ जाऊन पाहणी केली असता, ते टोकदार भाले असल्याचे दिसले. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत वन्यप्राणी उदमांजरीचे एकुण तीन पिल्ले मृता अवस्थेत आढळले. तसेच यानंतर घटनास्थळी जाऊन तपासणी केला असता आणखी तीन आरोपीजवळ मुंगुसचे केस जप्त केले. एकूण ६ आरोपींना ताब्यात घेतले.

मृत तीन उदमांजर पिल्लांचे शवविच्छेदन
कुडवा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एच. शेंद्रे व त्यांची टीम यांना वनपरिक्षेत्र कार्यालयात बोलावून कार्यालय परिसरात मृत तीन उदमांजर पिल्लांचे शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले. शवविच्छेदन करताना उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, सहायक वनसंरक्षक विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया (प्रादेशिक) प्रशांत हुमणे, वन्यजीव रक्षक नूर अली सैय्यद, मानद वन्यजीव रक्षक मुकेश निबांर्ते, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे उपस्थित होते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *