कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सहकार आणि साखर उद्योगाचा कणा मानला जातो. मात्र, चालू गळीत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांना अत्यंत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. साखरेचे उत्पादन मूल्य आणि खुल्या बाजारातील साखरेचे दर यांमधील तफावत, तसेच बँकेकडून ठरविण्यात आलेले साखरेचे मूल्यांकन यामुळे कारखान्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना नियमानुसार १५ दिवसांच्या आत उसाची एफआरपी (FRP) देण्याची कायद्याची अट पूर्ण करण्यासाठी कारखान्यांना कसरत करावी लागत आहे.
पहिली उचल आणि प्रत्यक्ष वास्तवातील तफावत:
हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या बैठकांमध्ये ठरल्यानुसार, पहिली उचल म्हणून एकरकमी प्रतिटन ३०० रुपये, त्यानंतर प्रतिटन १०० रुपये आणि साखरेचे दर स्थिर राहिल्यास आणखी २०० रुपये देण्याचा निर्णय झाला होता. शेतकरी संघटनांनीही हा तोडगा मान्य केल्यानंतर गाळप हंगामाला सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात हा दर देताना कारखान्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.
राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्यांकन प्रति क्विंटल ३७०० रुपयांवरून वाढवून ४२०० रुपये केले आहे. या मूल्यांकनातून बँकेच्या कर्जाचे हप्ते, तसेच तोडणी व वाहतुकीचा (Harvesting & Transport) खर्च वजा जाता, प्रत्यक्ष उसाच्या एफआरपीसाठी प्रति क्विंटल किंवा प्रतिटन केवळ २८३० रुपयेच शिल्लक राहतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रतिटन ३९०० रुपयांची पहिली उचल देणे कारखान्यांसाठी अशक्यप्राय बनले आहे. सध्याची स्थिती पाहता केवळ एफआरपी देण्यासाठीच प्रतिटन सुमारे ११०० रुपयांची तूट भासत आहे.
महिन्याची साखर विकून १५ दिवसांचे बिल भागवण्याची वेळ:
कायदेशीर तरतुदींनुसार, कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपी रक्कम १५ दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. हा कायदेशीर नियम पाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांची देयके वेळेत देण्यासाठी आता कारखान्यांवर महिनाभर उत्पादित झालेली साखर विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून १५ दिवसांचे ऊस बिल भागवण्याची नामुष्की ओढवली आहे. चालू वर्षाचा गळीत हंगाम जेमतेम १०० ते ११० दिवस चालण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीला तोडलेल्या उसाची बिले मिळतील, परंतु शेवटच्या टप्प्यात ऊस गळती करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना बिलासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




