नागपूर: शहरात आणि त्याच्या उपनगरांमध्ये खाणाऱ्याला थेट कर्करोगासारखे (कॅन्सर) जीवघेणे आजार निर्माण करणाऱ्या सडक्या सुपारीच्या अवैध गोरखधंद्याची व्याप्ती अत्यंत वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. या काळ्या धंद्यातून होणाऱ्या प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे नागपुरात अनेक नवे 'खिलाडी' आणि सुपारी माफिया तयार झाले आहेत. गब्बर झालेल्या या सुपारी माफियांनी उपराजधानीच्या विविध भागांत आणि विशेषतः शहराच्या सीमेवर सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने (भट्ट्या) आणि हजारो क्विंटल माल साठवून ठेवण्यासाठी मोठमोठी गोदामं थाटली आहेत.
शहराच्या सीमेवर आणि उपनगरांमध्ये उभारली गोदामं: रासायनिक प्रक्रिया करून सडक्या सुपारीला टणक आणि चकचकीत बनवून त्याची मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या विक्री केली जात असल्याने नागपुरात सुपारी माफियांनी आपले जाळे पसरले आहे. वाडी, मौदा, भंडारा रोड, पारडी, कळमना, विहिरगाव आणि किन्हाळा यांसारख्या नागपूरच्या सीमेवरील आणि बाहेरील विविध भागांत या माफियांनी मोठी गोदामं निर्माण केली आहेत. या गोदामांमध्ये तसेच विविध कोल्ड स्टोरेजमध्ये (नियम व प्रतिबंध असतानादेखील) ही सडकी सुपारी आणि रासायनिक भट्ट्यांमध्ये तयार केलेली घातक सुपारी मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवली जाते. बहुतांश गोदामं शहराच्या सीमेवर किंवा निर्जन भागात असल्यामुळे या गोरखधंद्यातील लोकांनाच त्याची गोपनिय माहिती असते. परिणामी, तेथून मालाची हेरफेर करताना माफियांना कोणतीही अडचण येत नाही आणि ही सुपारी 'ऑन डिमांड' गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दिल्लीसह देशातील विविध प्रांतांमध्ये सहज पाठवली जाते.
सडक्या सुपारीवर कशी केली जाते घातक रासायनिक प्रक्रिया? बाहेरून चोरून व लपूनछपून आणलेली आणि आतून पूर्णपणे सडलेली, कुजलेली तसेच मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेली सुपारी अधिक आकर्षक व टणक बनवण्यासाठी समाजकंटक सोयीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त भट्ट्या चालवतात. एका मोठ्या टॅंकमध्ये 'नॉन परमिटेड कलर' (प्रतिबंधित रंग) टाकून त्यात ही सडलेली सुपारी भिजवली जाते. त्यानंतर या भिजवलेल्या सुपारीवर चिकट पदार्थ (गोंद) आणि सल्फरच्या माध्यमातून अत्यंत घातक अशी रासायनिक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे सडकी आणि निरुपयोगी सुपारी फुगून टणक बनते. त्यानंतर जशी ग्राहकांची मागणी (डिमांड) असेल, त्याप्रमाणे कुठे अख्खी (पूर्ण) सुपारी, तर कुठे तिचे तुकडे (कतरा, चणाकट) करून ती वेगवेगळ्या राज्यांत आणि बाजारात परस्पर पाठवली जाते.
आरोग्याशी खेळ आणि प्रशासकीय आव्हाने: महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाला विक्रीवर सक्त प्रतिबंध असताना नागपूरच्या सीमेवर सुरू असलेला हा सडक्या सुपारीचा अवैध व्यापार तरुणांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा ठत आहे. या गोरखधंद्यामुळे अन्न सुरक्षा आणि आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, अशा बेकायदेशीर गोदाम व भट्ट्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
- पुणे: जेजुरीत नगरपालिकेचा ३९ गुंठ्यांचा भूखंड गेला कुठे? प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जेजुरीत पुकारला 'हलगीनाद' आंदोलन!
- नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नवी मुंबईत मोठे विधान
- पुणे: भीमाशंकर रोपवे प्रकल्प भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता थेट रोपवेने जाता येणार भीमाशंकरला, एका वेळी १४४ जणांची वाहतूक शक्य
महाराष्ट्र
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
- पुणे: जेजुरीत नगरपालिकेचा ३९ गुंठ्यांचा भूखंड गेला कुठे? प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जेजुरीत पुकारला 'हलगीनाद' आंदोलन!
- नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही; काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नवी मुंबईत मोठे विधान
- बीड: पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! वडिलांच्या रागवण्यामुळे घर सोडलेल्या १० वर्षीय मुलीचा १४ तासांत शोध, १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत केली सुखरूप सुटका
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!



























Subscribe to my channel




