नांदेडमधून मनोज जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'माराविरोधात महिलांची एक टोळी मुख्यमंत्र्यांना भेटली', कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक थांबवली जात असल्याचा गंभीर आरोप!

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नांदेड जिल्ह्यातील पोखर्णी (Pokharni, Nanded) येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. मराठा समाजाला मिळणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपावरून आणि आरक्षणावरून सध्या राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आपल्या नोंदी उपलब्ध असतानाही सरकारकडून जाणीवपूर्वक कुणबी प्रमाणपत्रे देण्याचे काम थांबवण्यात आले असून, अधिकारी अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचा संतापजनक दावा जरांगे यांनी केला.

"माझ्याविरोधात महिलांची एक टोळी मुख्यमंत्र्यांना भेटली":

या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, "राज्य सरकारने मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र वाटप अनधिकृतपणे थांबवले असून, माझ्याविरोधात अंतर्गत पातळीवर मोठे षडयंत्र रचले जात आहे." एवढेच नव्हे तर, "परवाच महिलांची एक विशेष टोळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटली असून, माझ्याविरोधात कटकारस्थान रचण्यात आले आहे आणि माझ्याकडे याचे भक्कम पुरावे देखील आहेत," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

अधिकारी अर्ज का स्वीकारत नाहीत?: सरकारवर थेट सवाल:

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, सामान्य जनता आणि मराठा बांधव जेव्हा प्रमाणपत्रासाठी कार्यालयात जातात, तेव्हा अधिकारी "आमच्याकडे वरून आदेश आहेत" असे सांगून अर्ज स्वीकारत नाहीत. जर अधिकारीच अर्ज स्वीकारणार नाहीत, तर नागरिकांपर्यंत कागदपत्रे कशी पोहोचणार असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला योग्य ती कुणबी प्रमाणपत्रे तातडीने मिळावीत आणि या प्रक्रियेतकोणताही राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *