बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन सुरु झालेला वाद आता टोकाला पोहोचला आहे. विनापरवानगी पुतळा बसवणे, प्रशासनाची कारवाई आणि त्यानंतर झालेली हाणामारी यामुळे गावात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर आता प्रशासनाने कलम १६३ (संचारबंदी) लागू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह २३ जणांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
बुलढाण्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन होणाऱ्या संघर्षाची सुरुवात ४ फेब्रुवारी रोजी झाली. चिखला काकड येथील अंगणवाडी परिसरात अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला. हा पुतळा स्थापन करण्यासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी नव्हती, असा अहवाल देण्यात आला. हा अहवाल मिळाल्यानंतर तहसीलदार कार्यालय लोणार यांनी ११ फेब्रुवारी रोजी हा पुतळा हटवण्याचे आदेश दिले. मात्र, २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री प्रशासकीय आदेशाला न जुमानता संतप्त शिवप्रेमींनी गावात पुन्हा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली. यामुळे दोन गटांत तीव्र वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
महिला पदाधिकाऱ्यावर अमानुष हल्ला
या वादादरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला. पुतळा हटवण्याच्या प्रक्रियेला विरोध करत असताना काही समाजकंटकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अश्लील वर्तन झाल्याचाही आरोप केले जात आहे. आता या घटनेचा राजकीय वर्तुळातून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी आता सध्या पोलीस कारवाई केली जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. यावेळी गावचे सरपंच गणेश काकड यांना वाशिम जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली असून, ३८ हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या गावात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. सिंदखेडराजा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या काही नेत्यांकडून विशिष्ट समाजाबद्दल द्वेष पसरवला जात आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला २४ फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कठोर कारवाई करा, असा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा दिला आहे.
दरम्यान पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ आणि वस्तुस्थिती मांडण्यासाठी वंजारी समाजातर्फे आज गावात सत्य कथन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ दोषींवरच कारवाई व्हावी, निष्पाप लोकांना त्रास दिला जाऊ नये, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काही मोठी कारवाई होणार का, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास परवानगी दिली जाणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
[embedded content]
शहर
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- नागपुरात भीषण दुर्घटना! ७० वर्षे जुनी भिंत कारवर कोसळली; ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
- बिहारमध्ये संतापजनक घटना! मोमोजचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढले; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक.
- शहापूर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नरदेवरेड्डी पुल्लागोर, तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत अन्नमवार यांची बिनविरोध निवड.
महाराष्ट्र
- नागपुरात भीषण दुर्घटना! ७० वर्षे जुनी भिंत कारवर कोसळली; ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
- शहापूर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नरदेवरेड्डी पुल्लागोर, तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत अन्नमवार यांची बिनविरोध निवड.
- नाशिकमध्ये काळाचा घाला! पंचवटीत ट्रकखाली चिरडून व्यावसायिकाचा दुर्दैवी अंत.
- वेदांत आयर्न अँड स्टीलच्या शेअरची जोरदार घोडदौड; सलग ११ व्या दिवशी लागलं अपर सर्किट!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- बिहारमध्ये संतापजनक घटना! मोमोजचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढले; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक.
- तुमची ट्रेन चुकली? काळजी नको, तिकीटाचे पैसे परत मिळवू शकता! जाणून घ्या काय आहेत नियम आणि प्रक्रिया.
- 'चंपत राय यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही'; राम मंदिर दान चोरी प्रकरणावर आचार्य धर्मदास महाराज आक्रमक!


























Subscribe to my channel

