सोलापूरला निघालेला पेट्राेलचा टॅंकर पेटला; परिस्थिती नियंत्रणात

साेलापूर : पाकणी येथून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या पेट्राेलच्या टॅंकरने अचानक पेट घेतला. या गाेष्टीचा चालकास अंदाज आल्याने त्याने रस्त्याच्या कडेला टॅंकर उभा केला. काही काळानंतर अग्नीशमन दलाने आग आटाेक्यात आणली. 

या घटनेबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी : उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी जवळील इंडियन ऑइलच्या डेपोतून एकूण २४ हजार लिटर पेट्रोल आणि डिझेल घेऊन आज (मंगळवार) सकाळी एक टँकर बाहेर पडला.

सोलापूरच्या दिशेने पूलानजीकच्या सेवा रस्त्यावरुन निघालेल्या टँकरने अचानक पुढच्या बाजूस पेट घेतला. चालकाच्या केबिनला आग लागली. त्यामुळे चालकाने आगीचा अंदाज घेत जागेवरच टॅंकर थांबावला. त्यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला टँकर लावला आणि बाहेर पडला.

त्यानंतर क्षणार्धात पूर्ण केबीननं पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. यावेळी पूलावर आग लागलेला टॅंकर पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली हाेती. या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळाल्यानंतर दलाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी आग आटाेक्यात आणली. या टॅंकरची केबीनची राख रांगाेळी झाली हाेती.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *