वर्ष 2026 च्या अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार विजेत्या रॉबर्टई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांचे संशोधन अत्यंतरंजक आहे. अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी केवळमहागाई, उत्पादन व व्याजाचे दर यांसारखे आकडे पाहणेपुरेसे नसते, तर कुटुंबे आणि व्यावसायिक कशा प्रकारेनिर्णय घेतात हे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते,हेच त्यांचे संशोधन सांगते. समजा एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपयेआहे. त्या कुटुंबाला आपली नोकरी सुरक्षित आहे आणियेत्या काळात उत्पन्न वाढेल असा विश्वास असेल, तर तेकुटुंब घर खरेदी करणे, मुलांच्या शिक्षणावर खर्च करणेकिंवा नवीन वाहन घेण्याचा निर्णय घेऊ शकते. मात्र,त्याच कुटुंबाला नोकरी जाण्याची भीती असेल किंवाव्यवसायात मंदीची शक्यता वाटत असेल, तर ते खर्चकमी करून बचत वाढवण्याचा प्रयत्न करेल. दोन्हीकुटुंबांचे सध्याचे उत्पन्न सारखेच असले तरी त्यांचेनिर्णय वेगळे असू शकतात. कारण आर्थिक निर्णय हेभविष्यातील शक्यता, आर्थिक सुरक्षा व उपलब्धमाहितीवरही अवलंबून असतात. रॉबर्ट ई. हॉल यांच्यासंशोधनाचा मुख्य संदेश हाच आहे. कुटुंबांचा खर्चसमजून घेण्यासाठी त्यांच्या आजच्या उत्पन्नासोबतचभविष्यातील उत्पन्नाबाबतच्या अपेक्षा समजून घेणेगरजेचे आहे. अनेक कुटुंबे भविष्याची चिंता करून खर्चकमी करतात. तेव्हा बाजारातील मागणी घटू शकते. याचाथेट परिणाम व्यापाऱ्यांच्या विक्रीवर होतो. तसेच गुंतवणूक, रोजगाराच्या नवीन संधींवरही परिणाम होऊ शकतो.अशा प्रकारे, वैयक्तिक पातळीवर घेतलेले निर्णय संपूर्णअर्थव्यवस्थेची दिशा बदलू शकतात. अर्थात, याचा अर्थअसा नाही की सर्वच कुटुंबांना भविष्याबद्दल पूर्ण माहितीअसते किंवा सगळे एकाच प्रकारे वागतात. उत्पन्नातीलअनिश्चितता, बचतीची क्षमता, कर्जाची उपलब्धता,कौटुंबिक गरजा या गोष्टीसुद्धा त्यांच्या निर्णयांवर प्रभावपाडतात. मायकेल वूडफोर्ड यांच्या संशोधनाने हेसमजण्यास मदत केली की, मध्यवर्ती बँकेच्या धोरणांचापरिणाम व्याजाचे दर बदलण्याने होत नाही; तर कुटुंबेआणि व्यावसायिक भविष्यातील आर्थिक परिस्थितीबाबतकेंद्रीय बँकेच्या धोरणांबाबत काय अपेक्षा ठेवतात,यावरही तो अवलंबून असतो. समजा भारतीय रिझर्व्हबँकेने व्याजदरात कपात केली, तर कर्ज स्वस्त होऊन घरखरेदीसाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळूशकते. पण, लोकांना भविष्यात उत्पन्न घटण्याची किंवारोजगार धोक्यात येण्याची भीती असेल, तर व्याजदर कमीअसूनही ते नवीन कर्ज घेणे टाळतील. याउलट, त्यांनाभविष्याबद्दल विश्वास असेल, तर ते उत्साहाने गुंतवणूकआणि खर्च वाढवायला तयार होतील. महागाई म्हणजेसामान्यपणे वस्तू आणि सेवांच्या किंमतींमध्ये होणारीवाढ. कच्चा माल, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च सततवाढेल असे व्यापाऱ्यांना वाटले, तर ते आपल्याउत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा विचार करू शकतात.उत्पन्न कमी होईल असे कर्मचाऱ्यांना वाटल्यास, तेअधिक वेतनाची मागणी करू शकतात. थोडक्यात अर्थव्यवस्थेचे यश हे केवळ योग्य धोरणेबनवण्यात नसून ती धोरणे लोकांच्या वागणुकीवर कसापरिणाम करतील हे समजून घेण्यात आहे. अर्थव्यवस्था हीकाही वेगळी चालणारी यंत्रणा नाही; ती कोट्यवधी कुटुंबे,व्यावसायिक, कर्मचारी आणि गुंतवणूकदार यांनीघेतलेल्या निर्णयांतून साकार होते. त्यामुळे अर्थव्यवस्थास्थिर ठेवण्यासाठी योग्य धोरणांसोबतच लोकांच्याअपेक्षा, त्यांची परिस्थिती आणि त्यांचा विश्वास समजूनघेणे तितकेच गरजेचे आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
महाराष्ट्र
- जालना: महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना जालन्यात भाजप नेत्यावर भजनात उधळल्या नोटा; संतापजनक प्रकारानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ!
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर



























Subscribe to my channel




