अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्याच्या प्रदीर्घ प्रलंबित रेल्वे विकासाचा प्रश्न आता अधिक तीव्रतेने एररळावर आला आहे. संसदेच्या रेल्वे स्थायी समितीच्या (Railway Standing Committee) बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार नीलेश लंके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. केवळ तोंडी आश्वासने नको, तर प्रत्येक रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती आणि तो पूर्ण होण्याच्या निश्चित तारखेची कालमर्यादा (Strict Timeline) प्रशासनाने जाहीर करावी, अशी आग्रही व आक्रमक मागणी त्यांनी केली. कागदोपत्री असणाऱ्या घोषणा आता प्रत्यक्षात जमिनीवर उतरल्या पाहिजेत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
पुणे-अहिल्यानगर लोकल, नवीन रेल्वे मार्ग आणि पॅसेंजर सेवांचे प्रश्न
संसदीय समितीच्या बैठकीत खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर जिल्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे आणि प्रलंबित रेल्वे प्रश्न चोखपणे मांडले. त्यात प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश होता:
-
पुणे-अहिल्यानगर लोकल व नवीन मार्ग: पुणे आणि अहिल्यानगर दरम्यान संपर्क वाढवण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग आणि लोकल ट्रेन सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी त्यांनी केली.
-
बंद पडलेल्या पॅसेंजर सेवा: कोरोना काळापासून किंवा मागील काही काळापासून बंद पडलेल्या नांदेड-दौंड, मनमाड-पुणे आणि शिर्डी-मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या पॅसेंजर व एक्स्प्रेस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
-
महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे: पुणे-लखनऊ, पुणे-गोरखपूर, यशवंतपूर-चंदीगड आणि संपर्क क्रांती यांसारख्या प्रमुख गाड्यांना अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, तसेच बेलवंडी व विसापूर स्थानकांवरही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे निश्चित करावेत.
स्थानक परिसरातील प्रवासी सुविधा व स्वच्छता
खासदार नीलेश लंके यांनी केवळ मोठ्या प्रकल्पांवरच नव्हे, तर सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन अडचणींवरही बोट ठेवले. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनसाठी केडगाव बाजूने स्वतंत्र स्टेशन इमारत आणि प्रवेशद्वार उभारावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच स्थानकावर लिफ्ट, एस्कलेटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षागृहे उपलब्ध करून देणे, ड्रेनेजची समस्या, दुर्गंधी, मोकाट कुत्रे आणि स्थानक परिसरातील अस्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
आरक्षण व चौकशी खिडकीच्या वेळा पूर्ववत सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत करण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. रेल्वे संपर्काचा विस्तार, प्रवाशांची सुरक्षा, शेतमाल वाहतुकीसाठी कार्गो टर्मिनल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी या सर्व मुद्द्यांवर रेल्वे प्रशासनाने आता केवळ आश्वासने न देता ठोस आणि पारदर्शक कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राजकारणात मोठी खळबळ! शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची गुप्त बैठक; जयंत पाटीलही उपस्थित!
- सातारा: दुष्काळामुळे पशुखाद्याचा प्रश्न गंभिर; जिल्ह्यातून बाहेर चारा विक्री व वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून सक्त मनाई!
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




