भूतान जिथे मी राजदूत म्हणून सेवा बजावली आहे. यादेशाला जीडीपीऐवजी ‘जीडीएच’ (ग्रॉस डोमेस्टिकहॅपिनेस) हा शब्द तयार करण्याचे श्रेय दिले जाते.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या सुंदर देशात जीडीएचखरोखरच उच्च आहे, पण भारतातही तो काही कमी नाही.हे एक असे वास्तव आहे, जे समाजशास्त्रज्ञ आणिअभ्यागत स्पष्टपणे पाहू शकतात. असे कसे शक्य आहेकी, ज्या देशात सामान्य जनता दररोज भयंकर आव्हानांशीझुंजते, तिथे इतकी अदम्य प्रसन्नता विखुरलेली असते?गरिबीने भरलेल्या गल्लीबोळांतही हास्य-विनोदाचेआवाज ऐकू येतात, मर्यादित साधने असलेल्या घरांतहीपाहुणचार कोणत्याही कंजुषीशिवाय होतो आणिअपयशांनंतरही निराशा क्वचितच वरचढ ठरते? भारताचा‘हॅपिनेस कोशंट’ (प्रसन्नत -सुचकांक) समजूनघेण्यासाठी आपल्याला उत्पन्न व पायाभूत सुविधांसारख्यामानकांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्य जाणिवेच्या ताण्याबाण्यामध्ये प्रवेश करावा लागेल. भारतीय समाधानाच्या केंद्रस्थानी कुटुंब नावाची संस्था आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था जरी शहरी भारतात क्षीण होत असली तरी ती अजूनही एक मध्यवर्ती संस्था म्हणून कायम आहे. एक मूल येथे कोणा एका वेगळ्या व्यक्तीच्या रूपात नाही, तर नात्यांच्या एका जिवंत तारामंडळाच्या आजी-आजोबा, चुलत-मामे भावंडे, काका-काकी, मामा-मामी इत्यादींच्या गोतावळ्यात मोठे होते. यातीलप्रत्येक जण त्याला स्नेह, शिस्त आणि सातत्य देतो.संकटाच्या वेळी नात्यांचे हेच जाळे भावनिक आधाराचेकाम करते. येथे व्यक्ती एकटी पडत नाही; तिला सावरूनधरले जाते. हाच भाव समुदायापर्यंत विस्तारतो, जिथेसामाजिक जीवन क्वचितच विखंडित होते. पश्चिमेकडेएकटेपणाला महामारी म्हटले गेले आहे. पण भारतातएकांत हा असा विलास आहे, जो खूप कमी लोकांनाउपलब्ध आहे आणि अनेकांना त्याची इच्छाही नसते. आपले कॅलेंडरही संस्थागत आनंदाचा एक उत्तमनमुनाच समजा. होळीच्या मुक्त रंगांपासून ते दिवाळीच्याप्रकाशमय रात्रींपर्यंत, पोंगलच्या सुगीच्या उत्सवापासून तेईद-उल-फित्रच्या सामुदायिक मेजवानीपर्यंत.संपूर्ण वर्ष याआठवणीने भरलेले असते की जीवन सर्वांनी मिळूनउत्सवाप्रमाणे जगायला हवे. जन्म, मुंज, विवाह इत्यादीसंस्कारही इथे सामूहिक सहभागाच्या संधी बनतात. लहान-लहान सुखांसाठी असलेली भारतीय प्रतिभापाहण्यासारखी असते. रस्त्यालगतच्या दुकानातीलसायंकाळचा चहा, सिनेमा, क्रिकेटवर होणाऱ्या जिवंतचर्चा; गर्दीच्या ट्रेनमध्ये किंवा चाळींमध्ये अचानकफुटणारे हास्याचे धबधबे, कुटुंबासोबत एखादी आवडतीटीव्ही मालिका पाहण्याचा उपक्रम, हे सर्व साधे,काटकसरीचे, पण खोल समाधान देणारे आत्मीयतेचेसंस्कार आहेत. आपल्या जीवनात असलेल्या आशेचे अस्तित्व.महामार्गांवर चालणाऱ्या ट्रक्सवरही अनेकदा अशा ओळीलिहिलेल्या दिसतात: ‘मिलेगा मुकद्दर’. अचानककुठूनतरी एखादा ईश्वरी वरदान मिळू शकेल, एखाद्यागुरूचा आशीर्वाद काम करेल, एखादे धार्मिक दान फळदेईल किंवा एखादा विधी चमत्कार करेल, ही भावनाभारतीय मनातून कधीही लोप पावत नाही. ‘नशिबाने कूसबदलणे’ किंवा ‘भाग्य बदलणे’ हे येथे केवळ प्रचलितवाक्प्रचार नाहीत, तर श्रद्धेचे विषय आहेत. हिंदूपुराणकथांमध्ये झोपड्यांचे महालात रूपांतर होण्याच्याआणि साध्या धातूंचे सोने बनण्याच्या कथा भरलेल्याआहेत. मला माझ्या वडिलाधाऱ्यांनी सांगितलेली गोष्टआठवते : ‘न जाणे कोणत्या रूपात देव भेटेल.’ आपली एक मोठी शक्ती आपला दार्शनिकस्वभावदेखील आहे. कर्माचा सिद्धांत, ज्याला अनेकदानशीबवाद म्हटले जाते-तो आपल्या जिवंत अनुभवातसमत्व जपण्याचे आवाहन आहे. हे सुचवते की जीवनएका वैश्विक नैतिक व्यवस्थेनुसार चालते. प्रयत्न करणेअनिवार्य आहे, परंतु परिणाम मनुष्याच्या नियंत्रणातनसतात. फळाची अपेक्षा सोडून आपल्या कर्तव्याचे पालनकरण्याचा गीतेचा उपदेश आपल्या सांस्कृतिकजाणिवेमध्ये खोलवर रुजला आहे. शतकानुशतकांचीआक्रमणे, वसाहतवादी शोषण, फाळणी आणिदीर्घकालीन आर्थिक अडचणींनी अस्तित्वाच्या रक्षणाचीएक सामूहिक स्मृती आपल्यामध्ये खोलवर रुजवलीआहे. सहन करत राहणे हे येथे काही असाधारण नाही; तीएक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. याच सहनशीलतेतून एकस्थिरचित्त विनोदबुद्धी जन्मली आहे. स्वतःच्याच दुर्दशेवरहसण्याची क्षमता. संसार मुळात मायामय आहे. हाविश्वास भौतिक यशाचा आनंद कमी करत नाही, पणसंकटाच्या वेळी तो अपयशाला दार्शनिक स्वीकृतीचे एककवच नक्कीच प्रदान करतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लहान सुखांसाठी असलेली भारतीयप्रतिभा पाहण्यासारखी असते.रस्त्यालगतच्या दुकानातील चहा,क्रिकेटवर होणाऱ्या चर्चा, गर्दीच्या ट्रेनमध्येअचानक फुटणारे हास्य हे साधे,सखोलसमाधान देणारे आत्मीय संस्कार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




