नवी दिल्ली: जर्मनीतील फ्रँकफर्टवरून नवी दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानाबाबत एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. विमान प्रवासात असताना पायलटेडडून 'हायजॅक अलर्ट' (Hijack Alert) मिळाल्यानंतर अहमदाबाद एअर ट्राफिक कंट्रोल (ATC) यंत्रणेत मोठी धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून एअर इंडियाचे विमान AI-2030 तातडीने जयपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले (Emergency Landing). या घटनेमुळे संपूर्ण विमान वाहतूक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून देशभरात एकच चर्चा सुरू आहे.
'Squawk 7500' कोड आणि आपत्कालीन लँडिंग
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणाऱ्या या विमानातील पायलटने काही सेकंदांसाठी विमान अपहरणाचा (Hijack) आंतरराष्ट्रीय संकेत असलेला 'Squawk 7500' हा आपत्कालीन कोड ट्रान्समिट केला होता. हा आपत्कालीन सिग्नल मिळताच अहमदाबाद येथील एअर ट्राफिक कंट्रोल रूम सतर्क झाली. त्यानंतर तातडीने दिल्ली विमानतळावरील वॉर रूम आणि सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून विमान जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्याचे निर्देश देण्यात आले.
सकाळी साधारण ९:३५ वाजता हे विमान (बोइंग ७८७-९) जयपूर विमानतळावर सुखरूप उतरवण्यात आले. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर तातडीने विमानतळावरील सुरक्षा प्रोटोकॉल राबवत विमान एका सुरक्षित 'आयसोलेशन बे' (Isolation Bay) मध्ये हलवण्यात आले.
सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई आणि तपास
विमान सुरक्षितपणे खाली उतरवल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने सुखरूप खाली उतरवले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), स्थानिक पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांनी संयुक्त मोहीम राबवत संपूर्ण विमानाची कसून तपासणी सुरू केली. तसेच प्रवाशांच्या सामानाचीही सखोल तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासात विमानातील सर्व ऑपरेशन्स सामान्य असल्याचे आढळले असले, तरी पायलटने हा आपत्कालीन कोड नेमका कोणत्या परिस्थितीमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे पाठवला होता, याबाबतची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. या घटनेमुळे विमान प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शहर
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: पिंपरी-चिंचवडमधील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणार!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
महाराष्ट्र
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
- नाशिक: डोंगरदऱ्या अन् कडेकपारीत जीवाची बाजी लावून मदतीला धावणारी सह्याद्रीची २२ वर्षीय धाडसी 'वाघीण' तनया कोळी!
- जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक: ३,०७४ मतदारांची अंतिम यादी अधिकृतपणे प्रसिद्ध नोव्हेंबरमध्ये होणार मतदान!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
गुन्हा
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर

























Subscribe to my channel




