नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार यादीतील कथित अनियमतांवविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विविध संघटनांतर्फे जंतरमंतरवर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. निषेध मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापासून जंतरमंतरकडे शांततापूर्ण मार्गाने मार्च काढत असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना (Supreme Court Lawyers) दिल्ली पोलिसांनी वाटेतच अडवून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे कायदेशीर वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत असून, 'सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन' (SCBA) ने तात्काळ हस्तक्षेप करत थेट भारताचे सरन्यायाधीश (CJI) यांच्याकडे धाव घेतली आहे.
वकिलांची धरपकड आणि घटनाक्रम: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विशेष तीव्र पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेतील त्रुटींवर आक्षेप घेण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही आंदोलक व विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत निदर्शने सुरू केली.
-
सर्वोच्च न्यायालयाचे वकील (ज्यामध्ये ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड सुमिता हजारिका यांच्यासह इतर कायदेतज्ज्ञांचा समावेश आहे) न्यायालयाच्या परिसरातून जंतरमंतरच्या दिशेने शांततापूर्ण मोर्चा घेऊन जात होते.
-
मात्र, सुरक्षा व्यवस्था आणि कलम १६३ लागू असल्याचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी वकिलांच्या या मार्चला रोखले आणि त्यांना बळाचा वापर करून व्हॅनमध्ये कोंबत ताब्यात घेतले.
-
पोलिसांनी केलेल्या या कारवाईदरम्यान वकिलांनी तीव्र विरोध दर्शवला आणि आम्हाला कुठे नेले जात आहे याची कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत माहिती दिली गेली नसल्याचा आरोप केला. या कारवाईत सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी कार्यकर्ते आणि इतर निदर्शकांनाही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचा सरन्यायाधीशांना धाव, तीव्र निषेध: वकिलांच्या बेकायदा धरपकडीची आणि पोलिसांनी केलेल्या बळाचापराची गंभीर दखल घेत 'सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन'ने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. असोसिएशनच्या वतीने थेट सरन्यायाधीशांकडे धाव घेण्यात आली असून, वकिलांवर केलेल्या कारवाईची आणि पोलिसांनी वापरलेल्या बळाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वकिलांना अशा प्रकारे रस्त्यात रोखणे आणि ताब्यात घेणे हे लोकशाही मूल्यांवर आणि कायदेशीर अधिकारांवर मोठा घाला असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
संपूर्ण दिल्लीमध्ये या आंदोलनामुळे सुरक्षेचा अभूतपूर्व बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मेट्रो स्थानके आणि महत्त्वाचे रस्ते सील करण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजधानीत तणावाचे आणि राजकीय उलथापालथीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



