सिंधुदुर्ग: वैभववाडी तालुक्यातील लोरे परिसराला मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पुन्हा एकदा वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या वादळामुळे दहाहून अधिक घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावर जागोजागी झाडे उन्मळून पडल्यामुळे वैभववाडी-फोंडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे लोरे व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
वादळामुळे मोतीराम सुतार, प्रणय रावराणे, प्रकाश गुरव, आनंदी सुतार, सुचित्रा रावराणे, जयराम रावराणे, विजया घाडी यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या घरांची छपरे उडाली, तर काही घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.
शाळा सुटण्याच्या वेळेत वादळ; मुले अडकली
सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेतच हे वादळ आल्यामुळे शाळकरी मुलांची मोठी धांदल उडाली. वैभववाडी-फोंडा मार्गावर सात ते आठ ठिकाणी झाडे कोसळल्याने दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे शाळकरी मुले आणि प्रवासी काही काळ रस्त्यातच अडकून पडले होते. स्थानिक मदतीने रस्त्यावरील झाडे हटवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
वीजपुरवठा खंडित; नुकसानीचा आकडा वाढणार
तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळामुळे मुख्य वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने लोरे आणि लगतच्या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. या आपत्तीत झालेल्या एकूण आर्थिक नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील इतर भागांतील स्थिती आणि प्रशासकीय सतर्कता: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दोडामार्ग, वैभववाडी, सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, कुडाळ, देवगड आणि मालवण या सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा व दळणवळण यंत्रणा प्रभावित झाली आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना व दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, नागरिकांनी आणि प्रवाशांनी अत्यंत गरजेशिवाय घराबाहेर पडू नये तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहर
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
महाराष्ट्र
- पुणेः पोलीस दलात मोठी खळबळ! औंध परिसरातील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून संपवले जीवन
- वर्धा: 'घरकुल योजनेचा' लाभ न मिळाल्याने थेट नगरपरिषदेत नागरिकाने अंगावर ओतून घेतले रॉकेल!
- परभणी: बळीराज्याला वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचाच; परभणीत एकनाथ शिंदेंची ठाम ग्वाही!
- पुणे: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही; पुरुषोत्तम जगतापांना लक्ष्य करत सुनेत्रा पवारांचा कडक इशारा!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर























Subscribe to my channel




