होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी गंभीर जखमी, भारताकडून तीव्र निषेध व्यक्त

जागतिक व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये तब्बल ११ भारतीय खलाशांसह एकूण १२ जण जखमी झाले आहेत.

ओमानच्या सागरी किनाऱ्याजवळ मंगळवारी पनामाचा ध्वज असलेल्या 'एमटी ऑन पीस' (MT On Peace) या व्यापारी जहाजावर हा अचानक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच ओमानच्या प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. ओमानच्या मदतकार्यामुळे जखमी खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना उपचारासाठी ओमानमधील खासब (Khasab) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर एकूण १९ कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी तब्बल १७ जण भारतीय नागरिक आहेत. या घटनेमुळे भारताची चिंता वाढली असून सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि सागरी व्यापारावर मोठा परिणाम होत असून या संपूर्ण प्रकरणावर भारताचे बारीक लक्ष आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *