बेंगळुरू: देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतील एक अत्यंत लाजिरवाणी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. तुरुंगातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याची बेकायदेशीरपणे सुटका करण्यासाठी डीआयजी (DIG) दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्या कैद्याच्या पत्नीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पोलीस आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, बेंगळुरू मध्यवर्ती कारागृहातील (परप्पना अग्रहार) हे प्रकरण असून, २०१८ मध्ये एका हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक बनावट (फर्जी) आदेश तयार करण्यात आला होता. या बनावट आदेशाच्या आधारे त्या कैद्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. या संपूर्ण कटात तुरुंगातील कर्मचाऱ्यांपासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असताना, त्या कैद्याच्या पत्नीने पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक जबाब दिला. आपल्या पतीची तुरुंगातून सुटका करून घेण्यासाठी आणि त्याला मदत करण्याच्या मोबदल्यात तत्कालीन मुख्य अधीक्षक आणि सध्याचे डीआयजी (उत्तर प्रादेशिक विभाग) असलेले एम. सोमशेखर (M. Somashekar) यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला. पीडित महिलेच्या या विधानानंतर आणि तपासात हाती आलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई करत डीआयजी एम. सोमशेखर यांना अटक केली आहे.
तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, मुख्य आरोपी अधिकाऱ्याने कैद्याच्या सुटकेसाठी केवळ बनावट सर्वोच्च न्यायालयाच्या कागदपत्रांचा आधार घेतला नाही, तर तुरुंगातील नियम धाब्यावर बसवून त्या कैद्याला नियमबाह्य पद्धतीने पॅरोलवर देखील सोडले होते. या बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी आणि गुन्ह्यासाठी मदत करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच पदाचा गैरवापर करून एका महिलेचे अशा प्रकारे शोषण केल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!

























Subscribe to my channel



