शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवार विमान अपघात प्रकरणात दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. अजित पवार हे रोहित पवार यांचे काका लागतात. मागच्या महिन्यात 28 जानेवारीला बारामती येथे अजित पवार यांचं चार्टर्ड विमान कोसळलं. त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या विमान अपघाताबद्दल अनेकांच्या मनात संशय, प्रश्न आहेत. त्यावर रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या थिअरी मांडतायत. काही खुलासे त्यांनी केले आहेत. तपास वेगाने व्हावा हाच त्यांचा उद्देश आहे.
आता रोहित पवार यांनी व्हीएसआर विमानाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. “दिल्लीचा एक क्रिकेटर व्हिएसआरच्या विमानात बसला होता. तेव्हा इंजिन की काही कोसळलं होतं. त्यानंतर तो व्हिएसआरच्या विमानात बसला नाही. त्याने व्हिएसआरला ब्लॅकलिस्ट केलं आहे. हा नामचीन क्रिकेटपटू आहे. त्याचं नाव सांगणार नाही. चौकशीत ते बाहेर येईलच” असा दावा रोहित पवार यांनी केला.
ट्रोलर्सना माहिती कशी मिळतेय?
“आमच्या पातळीवर आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय. दादांवर प्रेम करणारे जे लोक आहेत, त्यांनी सीसीटीव्ही फुटेजबद्दल माहिती मागितेलली. पण ती दिली नाही. तपासकर्त्यांकडे ती माहिती आहे कि नाही हे माहित नाही. सीआयडीने एकही रिपोर्ट दिलेला नाही. सरकारच्या माध्यमातून माहिती मिळालेली नाही. माहिती आमच्या लोकांना मिळत नाही. पण आमच्या ट्रोलर्सना भाजप पुरस्कृत ट्रोलर्सना एअरपोर्ट ऑथोरिटीच्या माध्यमातून सहज मिळतेय” असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. ते दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहेत.
तरीही ही माहिती लिक केली गेली
“मी कुठे गेलो. माझ्यासोबत कोण होतं. एक सेलिब्रिटी होता, याची माहिती त्यांना मिळाली आहे. मी स्वत: मागे दिल्लीत आलो होतो तेव्हा व्हिएसआरच्या विमानाने प्रवास केल्याचं सांगितलं होतं. तरीही ही माहिती लिक केली गेली. भाजपचे मोठे ट्रोर्लस आम्हाला ट्रोल करत आहेत. भाजप या रिसर्चवर प्रश्नचिन्ह का निर्माण करत आहे? यात काही वेगळा अँगल आहे का?” असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
भाजपच्या ट्रोलर्सना ही माहिती कोणी दिली?
“माझ्या सोबत असलेल्या सेलिब्रिटीच्या आधार कार्डाचे डिटेल्सही ट्रोर्ल्सकडे होते. भाजपच्या ट्रोलर्सना ही माहिती कोणी दिली? आरटीआय अंतर्गत कोणी अधिकारी आम्हाला माहिती देत नाही. पण एअरपोर्ट ऑथोरिटी, व्हिसीआर का माहिती देतेय?” असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले आहेत.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




