
Pune : शाळेत सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुणे येथील वारजे माळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पीडितेच्या कुटुंबाच्या ओळखीतील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १८ फेब्रुवारी रोजी सकाळी संबंधित अल्पवयीन मुलीला कारमधून शाळेत सोडतो, असे सांगून सोबत नेले. त्यानंतर कर्वेनगर भागातील डीपी रस्त्याजवळ कार थांबवून त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने पीडितेला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घाबरलेल्या मुलीने आईजवळ मन मोकळं केलं
घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आईकडे हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता; तसेच ‘पोक्सो’ कायद्याच्या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करीत आहेत.
कॉलेज विद्यार्थिनीचा पाठलाग करुन त्रास
दुसरीकडे, पुण्यातच हडपसर परिसरातील एका महाविद्यालयात जाणाऱ्या मुलीचा (वय १७) पाठलाग करून तिला त्रास दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सार्थक शिवाजी रुपनर (वय २२, रा. रुपनर वस्ती, लोणी काळभोर) याच्या विरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काही दिवसांपासून पीडित मुलीचा पाठलाग करत होता. ‘तू मला आवडतेस’ असे सांगत तो वारंवार तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता; तसेच सार्वजनिक ठिकाणी अडवून तिला त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या सततच्या त्रासामुळे मुलगी मानसिक तणावाखाली होती. अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




