नागपूर: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 'एनसीएमसी' (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्डमधील कोट्यवधी रुपये महामंडळाऐवजी थेट खासगी कंपनीच्या तिजोरीत जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान होत असून प्रवाशांमध्येही तीव्र अविश्वास निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारावरून आणि प्रवाशांच्या रिचार्जमधील अनधिकृत कपातीवरून महाराष्ट्र एसटी कामगार सेना आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
सध्याच्या घडीला राज्यात सुमारे ६ कोटी सवलतधारक प्रवासी असून, आतापर्यंत सुमारे १ कोटी २० लाख प्रवाशांनी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) घेतले आहे. मात्र, या कार्डाच्या रिचार्ज प्रक्रिया आणि निधी वितरणावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. प्रवाशांनी कार्डमध्ये १०० रुपयांचा भरणा केल्यास, प्रत्यक्षात पूर्ण रक्कम जमा होत नसून त्यातून काही पैसे कपात होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे सामान्य प्रवाशांची व विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण व्यवस्थेमुळे एसटी महामंडळाला मिळणारा निधी आणि शुल्काची रक्कम थेट खासगी कंपनीच्या खात्यात जात असल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केला आहे. रिचार्जवरील शुल्क आणि निधी एसटी महामंडळाच्या खात्यातच जमा व्हावा, अशी आक्रमक भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे. तसेच, बायोमेट्रिक प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला व ज्येष्ठ नागरिकांना अद्याप कार्ड मिळालेले नाही, ज्यामुळे त्यांना प्रवासातील सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे.
कार्ड नसलेल्या किंवा कार्ड मिळण्यात अडचणी येत असलेल्या प्रवाशांना पूर्वीप्रमाणे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रांच्या आधारे सवलत पूर्ववत सुरू ठेवावी, तसेच रिचार्जमधील कपात तात्काळ थांबवून प्रत्येक व्यवहाराची छापील पावती प्रवाशांना द्यावी, अशी जोरदार मागणी नागपूरसह राज्यभरातून केली जात आहे. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




