सिंधुदुर्ग: सावंतवाडी बसस्थानक परिसरात एका महिला प्रवाशाचे तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत महिला चोरट्याला गजाआड करण्यात सिंधुदुर्ग पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. जालना जिल्ह्यातील मंठा येथे सापळा रचून पोलिसांनी या आरोपी महिलेस शिताफीने ताब्यात घेतले.
संगीता सुभाष जाधव (वय ३५, रा. मंठा, जिल्हा जालना) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिला चोराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सावंतवाडी बसस्थानकावर एका महिला प्रवाशाचे मौल्यवान सोन्याचे दागिने अचानक चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवली.
तपासादरम्यान सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) संयुक्त पथकाने बसस्थानक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हेगाराचा माग काढण्यात आला. या तांत्रिक आणि खबऱ्यांच्या पुराव्यावरून सराईत गुन्हेगार संगीता सुभाष जाधव हिनेच ही चोरी केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. ती जालना भागात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने जालन्यातील मंठा येथे जाऊन सापळा रचला आणि आरोपी महिलेला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीदरम्यान आरोपी संगीता जाधव हिने सावंतवाडी बसस्थानकावर चोरी केल्याची कबुली दिली आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे व सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही यशस्वी धडक कारवाई पार पाडली. या कारवाईमुळे महिला प्रवाशांमध्ये सुरक्षिततेचा आत्मविश्वास वाढला असून सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
- पुणे: मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नियोजित आंदोलनाला तूर्त ब्रेक; २ ऑक्टोबरचा सत्याग्रह तात्पुरता स्थगित
महाराष्ट्र
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




