कोकण जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड; पेण स्थानकात सलग तीन तासांपासून गाडी ठप्प, प्रवाशांचे हाल!

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची व त्रसदायक बातमी समोर आली आहे. मुंबईहून मडगावच्या दिशेने निघालेल्या कोकण जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे ही महत्त्वाची रेल्वेगाडी मागील तब्बल तीन तासांपासून रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे स्थानकात एकाच ठिकाणी थांबवण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबईहून सुटलेली जनशताब्दी एक्स्प्रेस आपल्या नियोजित मार्गाने जात असताना अचानक तिच्या इंजिनात तांत्रिक समस्या निर्माण झाली. यामुळे चालकाला गाडी तातडीने पेण स्थानकावर थांबवावी लागली. गाडी अचानक थांबल्यामुळे आणि तीही मागील जवळपास तीन तासांपासून एकाच ठिकाणी रखडल्यामुळे डब्यांमध्ये बसलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निघालेल्या या गाडीतील प्रवाशांना सुरुवातीला दुरुस्तीबाबत किंवा पुढील प्रवासाबाबत कोणतीही स्पष्ट व खात्रीशीर माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळण्यास उशीर झाल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासह प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना स्थानकात तासनतास ताटकळत राहावे लागल्यामुळे पाण्याचा आणि खाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, रेल्वेचे तांत्रिक पथक बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, पर्यायी इंजिन किंवा तांत्रिक सुधारणा करून ही जनशताब्दी एक्स्प्रेस लवकरच मडगावच्या दिशेने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, या अचानक घडलेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *