मुंबई: "मनोज जरांगे एक नंबरचा चोर माणूस..."कोअर कमिटी सदस्य संजय कटारेवर ४ कोटींच्या वाळू चोरीप्रकरणी कारवाईनंतर अजय बारस्कर यांचा जळजळीत हल्लाबोल!

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान नेहमीच चर्चेत राहणारे आणि मनोज जरांगे पाटील यांचे टीकाकार म्हणून ओळखले जाणारे अजय बारस्कर यांनी पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील कोर कमिटीचे सदस्य असलेल्या संजय कटारे यांच्यावर अवैध वाळू चोरी प्रकरणी मोठी प्रशासकीय कारवाई झाल्यानंतर अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची कोअर कमिटी आणि जवळचे सहकारी मानले जाणारे संजय कटारे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अवैध वाळू उत्खनन आणि चोरी प्रकरणी दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संजय कटारे आणि अन्य ११ जणांनी मिळून तब्बल ४ कोटी रुपयांची वाळू चोरल्याचा गंभीर आरोप असून, याप्रकरणी प्रशासनाकडून त्यांच्यावर मोठा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईनंतर आक्रमक झालेल्य अजय बारस्कर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कडाडून टीका केली.

अजय बारस्कर यांनी बोलताना म्हटले की, "मनोज जरांगे हे एक नंबरचे चोर आहेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हाच खरा चेहरा आता समोर येत आहे." मराठा आंदोलनाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची दिशाभूल सुरू असून त्यांच्याच कोर कमिटीतील प्रमुख सदस्य अवैध रेती उपसा आणि कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारात गुंतले आहेत, असा दावा बारस्कर यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच बारस्कर यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) देखील धाव घेऊन काही सहकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती, ज्याचा पुनरुच्चार त्यांनी या घडामोडीनंतर केला.

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर मराठा आंदोलक आणि संबंधित बाजूकडून काय प्रत्युत्तर येते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वाळू चोरी प्रकरणातील दंडात्मक कारवाई आणि त्यानंतर अजय बारस्कर यांनी दिलेले वादग्रस्त व आक्रमक वक्तव्य यामुळे मराठा आरक्षण आंदोलन आणि राजकीय वर्तूळात पुन्हा एकदा मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे आगामी काळात राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *