चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातून अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या विविध गुंतागुंतीमुळे दोन मातांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि वैद्यकीय सुविधेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला बल्लारपूर येथे बाळानंतर अवघ्या काही तासांत ३४ वर्षीय मातेचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे भंडारा येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मातेचा उपचारादरम्यान प्राण गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बल्लारपूर (चंद्रपूर) येथील घटना: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील 'साई मॅटर्निटी ॲण्ड नर्सिंग होम'मध्ये प्रसूतीदरम्यान माता आणि तिच्या नवजात बालकाचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. नीलम कुमारी सिंह (वय ३४) असे मृत मातेचे नाव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नीलम कुमारी यांना २२ सप्टेंबर रोजी दुपारी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली. नैसर्गिक प्रसूतीनंतर बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळल्याने पुरेशा ऑक्सिजनअभावी सुमारे तासाभराने नवजात बालकाचा मृत्यू झाला.
या दुःखातून सावरत असतानाच मातेची प्रकृतीही वेगाने खालावली. नीलम कुमारी यांचा रक्तदाब (Blood Pressure) अत्यंत खालावल्यामुळे आणि प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे चंद्रपूर येथून दोन विशेष तज्ज्ञ डॉक्टरांना तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र, अथक प्रयत्न करूनही उपचारादरम्यान मातेचा जीव वाचविण्यात अपयश आले. या घटनेमुळे संतप्त वातावरण निर्माण झाले असून, शवविच्छेदन (Post-mortem) आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या (Civil Surgeon) अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले.
भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना: दुसरीकडे, भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीनंतर एका अत्यंत अल्पवयीन, अवघ्या १५ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. छत्तीसगड राज्यातून रोजगाराच्या शोधात भंडारा जवळील मौदा तालुक्यात आलेल्या एका कामगार कुटुंबातील ही अल्पवयीन मुलगी होती. तिला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर तातडीने भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या गंभीर गुंतागुंतीमुळे तिची प्रकृती कमालीची बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा अंत झाला. अवघ्या १५ व्या वर्षी मातृत्व अनुभवताना प्राण गमवावा लागल्याने या घटनेने सर्वत्र तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
- जालना: ११२३ दिवस अन् ११ उपोषणे!; जेथून मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारला, तो ऐतिहासिक मांडप आणि स्टेज अखेर काढला!
- बीड: हादरवणारी बातमी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरी संपवले जीवन
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




